राष्ट्रीय महामार्गानजीक नाल्या अर्धवट, घनकचऱ्याची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:55+5:302021-08-24T04:39:55+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत खासगी कंत्राटदाराद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व गावांतर्गत सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या. मात्र ठाणा ...

राष्ट्रीय महामार्गानजीक नाल्या अर्धवट, घनकचऱ्याची वाढ
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत खासगी कंत्राटदाराद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व गावांतर्गत सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या. मात्र ठाणा राष्ट्रीय महामार्ग सोनामातानगर ते जुना ठाणा राष्ट्रीय महामार्गापर्यंत दीड किलोमीटरच्या गावांतर्गत रहदारीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नाही. नाल्यांचे बांधकाम अर्धवट करण्यात आले. परिणामी दरवर्षी रस्त्यांवरील पावसाचे सांडपाणी गावांमधून वाहून जात असते. यामुळे खासगी विहिरी हातपंपामध्ये दूषित पाण्याचा शिरकाव होतो. गावातील पाण्याच्या जलद प्रवाहाने रस्त्यावर खड्डे पडतात. त्याच्या परिणामी नागरिकांना प्रवास करणे कठीण जात असते. ठाणा जवाहरनगर टी पाईंट नागपूर बस स्थानकसमोर, ठाणा गॅस एजन्सी ते निर्माणी पतसंस्थेचा पेट्रोल पंपदरम्यान अर्धवट नाल्यांचे बांधकाम केलेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन फूट खोल नाल्यामध्ये घनकचरा साचलेला आहे. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना पाण्यामधून वाट काढावी लागते. या पाण्याचा रस्त्यावरून रहदारीमध्ये शिरकाव होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.