नायब तहसीलदारांनी हाणली कोतवालाच्या कानशिलात
By Admin | Updated: December 29, 2014 00:58 IST2014-12-29T00:58:16+5:302014-12-29T00:58:16+5:30
क्षुल्लक कारणावरुन लाखनीचे नायब तहसिलदार गोटेफोडे यांनी कोतवाल गणेश कान्हेकर यांच्या कानशिलात हाणल्याचा प्रकार लाखनी तहसिल कार्यालयामध्ये घडला

नायब तहसीलदारांनी हाणली कोतवालाच्या कानशिलात
लाखनी/आमगाव : क्षुल्लक कारणावरुन लाखनीचे नायब तहसिलदार गोटेफोडे यांनी कोतवाल गणेश कान्हेकर यांच्या कानशिलात हाणल्याचा प्रकार लाखनी तहसिल कार्यालयामध्ये घडला असून नायब तहसिल दारावर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
तलाठी साजा क्रमांक ३४ कोलारी येथील कोतवाल गणेश कान्हेकर यांची १४ डिसेंबरला रात्रपाळीची ड्युटी होती ते कर्तव्यावर असताना प्रभारी नायब तहसिलदार गोटेफोडे हे तिथे आले. आणि त्यांनी क्षुल्लक कारणांवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली यावर ते न थांबता मारहाण केली. या घटनेबाबत तहसिलदारांशी चर्चा करण्यात आली.
याबाबत कोतवाल कान्हेकर यांनी तहसिलदार लाखनी यांना निवेदन दिले असून गोटेफोडे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी तक्रारीमधून केली आहे. कोतवाल मारहाण प्रकरणात नायब तहसिलदार गोटेफोडे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अन्यथा कोतवाल संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे. (वार्ताहर)