नागझिरा अभयारण्यात ४५ हेक्टर जंगल आगीच्या विळख्यात
By Admin | Updated: May 22, 2016 00:22 IST2016-05-22T00:22:02+5:302016-05-22T00:22:02+5:30
नागझिरा अभयारण्यात फेब्रुवारी ते मेपर्यंत २५ घटनांमध्ये ४५ हेक्टर जंगल परिसरात आग लागली.

नागझिरा अभयारण्यात ४५ हेक्टर जंगल आगीच्या विळख्यात
चार महिन्यांतील घटना : वनसंपदा नष्ट, प्राण्यांची जीवितहानी टळली
शिवशंकर बावनकुळे साकोली
नागझिरा अभयारण्यात फेब्रुवारी ते मेपर्यंत २५ घटनांमध्ये ४५ हेक्टर जंगल परिसरात आग लागली. यात कोका जंगलात आगीच्या ९ घटनामध्ये २९ हेक्टरमधील जंगल जळाले तर नागझिरा अभयारण्यातील तीन आगीच्या घटनेत १६ हेक्टरमधील जंगल वणवा लागून जळाले.
सुमारे ६०० स्वेकअर किलोमीटर क्षेत्रात असलेल्या नागझिरा नवीन नागझिरा कोका नवेगावबांध अभयारण्यात यावर्षी बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. फायर प्रोटेक्शन वॉच टॉवर सेंटरवरून चोवीस तास निगरानी ठेवली जात आहे. यात नागझिरा ४, नवेगाव ५, उमरझरी १, पिटेझरी २, डोंगरगाव ५, बोंडे ६, कोका २, नवेगाव २ असे २८ आगीवर नियंत्रणासाठी २८ वॉच टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरवरून २४ तास आगीवर नियंत्रण ठेवले जात आहे. जंगलातील आगीच्या १९ टक्के मानवनिर्मित असतात आग लागल्यानंतर ती पसरण्याच्या आत विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. वनकर्मचाऱ्यामार्फत झाडाच्या फांद्या तोडून आगीवर फांद्याच्या साहय्याने मारा करून आग विझविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. आग लावणाऱ्याला पकडून वचक बसविला जात आहे. पर्यटकासोबत वनविभागाचे गाईड असल्यामुळे आग नियंत्रणाबाबत सक्त ताकीद दिले जात आहे.
आग विझविण्यासाठी ब्लोअर्सचा वापर केला जात आहे. फायर प्रोटेक्शन वॉच टॉवर सेंटरवरून चोवीस तास गिरानी ठेवली जात आहे. नागझिरा अभयारण्यात बरेच प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
-न.ब. खंडाते,
सहायक वनसंरक्षक नागझिरा.