मुरमाडी-सावरीत मोहफुल दारूविक्रीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:45 IST2017-05-05T00:45:21+5:302017-05-05T00:45:21+5:30

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील दारू दुकाने बंद करण्यात

Murmadi-free Muhful daruquirla in the spring | मुरमाडी-सावरीत मोहफुल दारूविक्रीला उधाण

मुरमाडी-सावरीत मोहफुल दारूविक्रीला उधाण

सालेभाटा/लाखनी : सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील दारू दुकाने बंद करण्यात आल्यानंतर मोहफुलापासून गाळण्यात येणाऱ्या मद्यविक्रीला ऊत आला आहे.
व्यसनमुक्ती महिला संघर्ष समिती सावरी, मुरमाडी, लाखनी परिसरातील दारू दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन केले. अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या परंतु सावरी, मुरमाडी, लाखनी परिसरातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे. सावरी, मुरमाडी परिसरात मोहाफुलापासून तयार होणारी दारू विक्रीच्या व्यवसायाला उधाण आले आहे. सावरी, मुरमाडी परिसरात दारूची अवैध विक्री खुलेआम सुरू आहे. तरीपण पोलीस अधिकारी मोहफुलाच्या दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. व्यसनमुक्ती महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा मंदा गभणे यांच्यासह महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना मोहफुलाची दारू विक्री चालू असल्याचे सांगितल्यावरही त्यांच्याकडून थातुरमातुर चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप मंदा गभणे यांनी केला आहे. सावरी, मुरमाडी परिसरातील परवानाप्राप्त देशी विदेशी दारू दुकाने बंद झाली. परंतु मोहफुलाची अवैध दारू विक्री बंद झालेली नाही. सायंकाळी सावरीत मद्य शौकिनांची जत्रा भरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सावरी, मुरमाडी परिसरातील मोहफुलाची दारूविक्री बंद करावी अन्यथा लाखनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मंदा गभणे यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Murmadi-free Muhful daruquirla in the spring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.