कारागृहातून सुटलेल्या तरुणाने केला तरुणीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:05 IST2019-12-21T12:05:43+5:302019-12-21T12:05:46+5:30

कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या एका तरुणाने गावातील तरुणीचा लोखंडी राॅडने हल्ला करून खून केला.

Murder of a young man released from prison | कारागृहातून सुटलेल्या तरुणाने केला तरुणीचा खून

कारागृहातून सुटलेल्या तरुणाने केला तरुणीचा खून

भंडारा: कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या एका तरुणाने गावातील तरुणीचा लोखंडी राॅडने हल्ला करून खून केला. ही घटना पवनी तालुक्याच्या निम्सी (तिर्री) येथे शुक्रवारी रात्री घडली. नितू शशिकांत रंगारी (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. संदीप संजय तांडेकर (२८) या आरोपीनं तिचा खून केला. लोखंडी राॅडने भरचौकात केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी तरुणीचा नागपूर येथे उपचारादरम्यान पहाटे मृत्यू झाला. आरोपी पसार असल्याने खुनाचे कारण कळू शकले नाही. अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Murder of a young man released from prison