खासदार सुनिल मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकची धडक; वैनगंगा पुलावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 19:13 IST2023-05-22T19:12:47+5:302023-05-22T19:13:25+5:30
Bhandara News खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला भंडाराजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर ट्रकने धडक दिली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कसलीही दुघर्टना घडली नाही.

खासदार सुनिल मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकची धडक; वैनगंगा पुलावरील घटना
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला भंडाराजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर ट्रकने धडक दिली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कसलीही दुघर्टना घडली नाही.
खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबिराला व जनता दरबाराला उपस्थित राहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावकडे निघाले होते. वैनगंगा नदीवरील पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याच वाहतूक कोंडीदरम्यान दोन ट्रक चालकांचे भांडण झाले. या भांडणात खासदारांच्या ताफ्यातील इनोव्हा गाडीच्या मागे असलेल्या ट्रक चालकाला दुसऱ्या ट्रकचालकाने केबिनमधून गाडीखाली ओढले. विशेष म्हणजे यावेळी ट्रक गिअरमध्येच होता. चालक खाली पडल्यावर हा अनियंतत्रित ट्रक पुढे जावून खासदारांच्या ताफ्यातील वाहनाला घासत गेला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने आत बसलेल्या तसेच वाहतूक कोंडीत अडकलेल्या इतर दुचाकी, चारचाकी वाहनांना दुखापत झाली नाही.