उभ्या ट्रकवर मोटरसायकल आदळली; एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:33 IST2021-03-07T10:33:30+5:302021-03-07T10:33:38+5:30
तुमसरलगतच्या खापा येथील घटना

उभ्या ट्रकवर मोटरसायकल आदळली; एक ठार, दोन गंभीर
तुमसर (भंडारा) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मोटरसायकल आदळून झालेल्या अपघाताय एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री तुमसरलगत खापा येथे घडली.
प्रकाश उपासराव शेंडे (२५) रा. चिखला ता. तुमसर ह.मु.डोगरगाव ता. मोहाडी असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर दीपक सुखदेव मेहर (२५), लक्ष्मण घनश्याम चाचिरे (२५) दोघे रा.डोगरगाव ता. मोहाडी जि. भंडारा असे जखमीची नावे आहेत. प्रकाश शेंडे मित्र दीपक मेहर व लक्ष्मण चाचिरे यांच्यासह मोटारसायकलने तुमसर येथील मधुमिलन लॉन येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.
कार्यक्राम संपल्यावर डोंगरगाव येथे परत जात असताना खापा चौकात उभ्या असलेल्या ट्रकवर मोटरसायकल धडकली. धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक प्रकाश जागीच ठार झाला तर दीपक व लक्ष्मण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.