दोन चिमुकल्यांसह विष प्राशन करणाऱ्या मातेस अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 22:34 IST2022-01-01T22:24:24+5:302022-01-01T22:34:02+5:30
Bhandara News घरगुती वादात दोन चिमुकल्यांसह मातेने विष प्राशन केल्याने १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील ठाणा येथे घडली होती. या प्रकरणी मातेला अखेर शनिवारी सयंकाळी अटक करण्यात आली.

दोन चिमुकल्यांसह विष प्राशन करणाऱ्या मातेस अखेर अटक
भंडारा : घरगुती वादात दोन चिमुकल्यांसह मातेने विष प्राशन केल्याने १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील ठाणा येथे घडली होती. या प्रकरणी मातेला अखेर शनिवारी सयंकाळी अटक करण्यात आली.
वंदना ज्ञानेश्वर सहारे (वय ३६) असे अटकेतील मातेचे नाव आहे. तिने १३ डिसेंबरला रात्री मुलगा कार्तिक ज्ञानेश्वर शहारे १४ महिने, विधी ज्ञानेश्वर शहारे (५) या दोन चिमुकल्यांसह स्वत:ही विष प्राशन केले होते. त्यात चिमुकल्या कार्तिकचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी तिला अटक करण्यात आली.