अडीच टनांपेक्षा जास्त आरडीएक्स इमारतीखाली दबलेले; भंडाऱ्यातील रेस्क्यू ऑपरेशन सर्वात धोकादायक

By नरेश डोंगरे | Updated: January 24, 2025 23:36 IST2025-01-24T23:34:57+5:302025-01-24T23:36:09+5:30

bhandara ordnance factory स्फोटाच्या घटनेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर सुमारे तासभर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर भुजबळ यांनी बाहेरच्या परिसरात पत्रकारांशी चर्चा केली.

More than 2.5 tonnes of RDX buried under building bhandara ordnance factory; Rescue operation most dangerous | अडीच टनांपेक्षा जास्त आरडीएक्स इमारतीखाली दबलेले; भंडाऱ्यातील रेस्क्यू ऑपरेशन सर्वात धोकादायक

अडीच टनांपेक्षा जास्त आरडीएक्स इमारतीखाली दबलेले; भंडाऱ्यातील रेस्क्यू ऑपरेशन सर्वात धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : आयुध निर्माणीत झालेल्या भीषण स्फोटामुळे जमीनदोस्त झालेल्या इमारतीखाली सुमारे अडीच टनांपेक्षा जास्त आरडीएक्स पडून असल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली.

स्फोटाच्या घटनेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर सुमारे तासभर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर भुजबळ यांनी बाहेरच्या परिसरात पत्रकारांशी चर्चा केली. त्यांनी या भीषण स्फोटात आठ जण ठार आणि पाच जण जखमी झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले एनडीआरएफ एसडीआरएफ च्या पथकांनी प्रोफेशनली काम करून मलब्यात दबलेल्या १३ जणांना बाहेर काढले.

मदत आणि बचाव कार्याचा दुसऱ्या टप्पा उद्या सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन हे देखिल हजर होते.

Web Title: More than 2.5 tonnes of RDX buried under building bhandara ordnance factory; Rescue operation most dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट