मानधन रोखीने मिळणार!
By Admin | Updated: July 21, 2015 00:42 IST2015-07-21T00:42:47+5:302015-07-21T00:42:47+5:30
निवडणूक कार्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून नियुक्त केले जाते.

मानधन रोखीने मिळणार!
ग्रामपंचायत निवडणूक : समस्येचे निराकरण
पवनी : निवडणूक कार्यासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून नियुक्त केले जाते. यापूर्वी १९९८ पासून ग्रामपंचायत निवडणूक कार्याचे मानधन कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नव्हते. दैनिक लोकमतने निवडणूकीचे मानधनापासून कर्मचारी वंचित असल्याचे वृत्त प्रसिध्द केले. दि. २० रोजी झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान तहसीलदार नरेंद्र राचेलवार यांनी प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच निवडणूकीचे दिवसीचे कर्मचाऱ्यांना सदर निवडणूकीत काम केल्याचे मानधन रोखीने देण्यात येणार असल्याचे घोषित केले. तसेच थकीत मानधन दि. १५ आॅगस्टपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
निवडणूक प्रशिक्षणात असलेल्या कर्मचाऱ्यांनी रोखीने मानधन मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला असून अनेकांनी तालुका प्रतिनिध व जिल्हा कार्यालयात भेट देवून आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)