शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटच ठरली प्रभावी

By admin | Updated: October 19, 2014 23:16 IST

राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला कंटाळलेल्या नागरिकांवर मोदी यांच्या लाटेचा सकारात्मक परिणाम झाला. लोकसभा निवडणुकीत या लाटेमुळे राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते प्रफुल पटेल यांचा

भंडारा : राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला कंटाळलेल्या नागरिकांवर मोदी यांच्या लाटेचा सकारात्मक परिणाम झाला. लोकसभा निवडणुकीत या लाटेमुळे राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते प्रफुल पटेल यांचा पराभव झाला होता. ही लाट ओसरल्याचे आघाडीच्या नेत्यांकडून बोलले जात होते. परंतु स्पष्ट कौल देऊन लाट कायम असल्याचे दाखवून दिले.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रचार केला. त्यांच्याव्यतिरीक्त राज्यातील एकही नेते प्रचारासाठी आले नव्हते. भंडारा आणि साकोली क्षेत्रात मतदारांनी नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर गेली. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता प्रचारासाठी जिल्ह्यात आलेला नव्हता. साकोली क्षेत्रात सेवक वाघाये यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वाधिक ५५ हजारांवर मते काँग्रेसच्या झोळीत टाकले. भंडारा क्षेत्रात काँग्रेसची धुरा माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे सांभाळली होती. त्यातुलनेत भाजपच्या स्टार प्रचारकांनी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघ पिंजून काढले. याशिवाय भाजपशासित राज्यातील मंत्री व पदाधिकारी विधानसभानिहाय क्षेत्रात ठाण मांडून होते. त्यांची बारीकसारीक घटनांवर नजर होती. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा या पक्षामध्ये कोण कुणाचा प्रचार करीत आहे, याचा अदमासही उमेदवारांना लागू शकला नाही. आम्ही तुमचेच आहोत, असे सांगून फिटविण्याचे काम केले. (जिल्हा प्रतिनिधी)