शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा ‘हल्लाबोल’

By admin | Updated: September 21, 2016 00:27 IST

भंडारा उपवन संरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत दहा महिन्यापूर्वी वृक्षांची कटाई करण्यात आली.

प्रकरण वृक्षकटाईचे : उपवनसंरक्षकांनी दिले निलंबनाचे आश्वासनभंडारा : भंडारा उपवन संरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत दहा महिन्यापूर्वी वृक्षांची कटाई करण्यात आली. मात्र या कटाईला परवानगीच नसल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. या प्रकरणात दोषी वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांना निलंबित करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात आज वनविभागावर हल्लाबोल करण्यात आला. ‘कुंपणच शेत खाते तेव्हा’ काहीसा असाच प्रकार मागील अनेक दिवसांपासून वनविभागात सुरु आहे. ज्या वनाधिकाऱ्यांवर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी आहे त्यांनीच वनविभागाचा कायदा पायदळी तुडविल्याचा प्रकार समोर येत आहे. सुमारे दहा महिन्यापूर्वी भंडारा उपवनसंरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय परिसरात असलेले गगनचुंबी मौल्यवान साग व आडजात वृक्षांची कटाई केली. केवळ बारा झाडांच्या कटाईची परवानगी पालिका प्रशासनाने दिली असताना येथील वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत या दोन्ही कार्यालयात लाखो रुपये किमतीच्या शेकडो झाडांची अक्षरश: कत्तल केली. यासोबतच कोका विश्रामगृहातील लाकूड साहित्यांचीही अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. एक ना अनेक प्रकरण चव्हाट्यावर येत असताना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेश्राम यांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालविला. या प्रकरणाची श्रृंखलाच ‘लोकमत’ने लावून धरली आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील आठवड्यात या प्रकरणात दोषी असलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करण्याचा इशारा उपवनसंरक्षक अतुल वर्मा यांना दिला होता. या उपरांतही कारवाई थंडबस्त्यात असल्याने आज मंगळवारला मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांच्या नेतृत्वात सुमारे शंभरावर कार्यकर्त्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी उपवनसंरक्षक अतुल वर्मा हे कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त मनसैनिकांनी वनकार्यालयात घोषणाबाजी करून वनअधिकाऱ्यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी वनविभागाचे मुख्य लेखापाल एस.डब्लू. बन्सोड यांना घेराव घातला. यानंतर भांबावलेल्या बन्सोड यांनी भ्रमणध्वनीवरून उपवनसंरक्षक अतुल वर्मा यांच्याशी संपर्क साधून मनसेच्या हल्लाबोल कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी विजय शहारे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष नितीन वानखेडे, चोपराम तिवाडे, ज्ञानेश्वर पोगडे, दिनेश बारापात्रे, सोमेंद्र शहारे, अभिषेक राजदेरकर, अतुल भिरे, प्रकाश कानतोडे, मनीष पडोळे, मिलिंद ठाकरे, नजीर बांते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)उपवनसंरक्षकांनी दिले आश्वासनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेस्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आज आंदोलन होणार याची कल्पना उपवनसंरक्षक वर्मा यांना मिळाल्याची माहिती आहे. मनसैनिकांचा हल्लाबोल कार्यालया पोहचला तेव्हा ते उपस्थित नसल्याने मुख्य लेखापाल बन्सोड यांना घेराव घालण्यात आला. दरम्यान उपवनसंरक्षक वर्मा यांच्याशी आंदोलनकर्त्यांचा संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार माझ्याच क्षेत्रात नाही. मेश्राम यांच्या कार्यप्रणालीचा इत्यंभूत अहवाल मुख्य वनसंरक्षकांना तात्काळ पाठविण्यात येईल. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी पाठपुरावाही करण्यात येईल व कोणालाही कारवाईतून सोडणार नसल्याचे आश्वासन यावेळी मनसेचे शहारे यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उपवनसंरक्षक वर्मा यांची आंदोलनादरम्यान प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. त्यांनी भ्रमणध्वनीवरून मेश्राम यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या आठवड्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास वनविभागावर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. -विजय शहारेजिल्हाध्यक्ष, मनसे, भंडारा