सिमेंट रस्त्यांच्या कामात मिक्सिंग
By Admin | Updated: June 25, 2014 00:14 IST2014-06-25T00:14:00+5:302014-06-25T00:14:00+5:30
शासनाकडून रस्ते निर्मितीसाठी लाखोंचे अनुदान प्राप्त झाले. मात्र रस्ता खडीकरण मुरुमीकरण व सिमेंटीकरणाचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

सिमेंट रस्त्यांच्या कामात मिक्सिंग
अल्प साहित्यांचा वापर : पदाधिकारी सदस्यांचे संगनमत
अड्याळ : शासनाकडून रस्ते निर्मितीसाठी लाखोंचे अनुदान प्राप्त झाले. मात्र रस्ता खडीकरण मुरुमीकरण व सिमेंटीकरणाचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अड्याळ येथील ग्रामपंचायतीअंतर्गत होणाऱ्या रस्त्यांच्या कामात ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची संबंधित कंत्राटदारासोबत सेटींग करण्यात येत असल्याची माहिती आहे. साहित्याचा दर्जा सुमार असून सिमेंटीकरण म्हणजे मिक्सींग नव्हे फिक्सींग होय असा एकमुखी सुर अड्याळ ग्रामवासीयांत सुरु आहे.
काम सुरु झाले की, ग्रामपंचायतच्या काही पदाधिकारी सदस्यांनी जायचे. क्वॉलीटी कंट्रोलवर बोलायचे फोटो घ्यायची काम बंद पाडायचे अन् सायंकाळ झाली की संबंधित कंत्राटदाराशी पैशांची फिक्सींग करून दुसऱ्या दिवशी काम सुरु करायचा. असे चित्र अड्याळ येथे सुरु आहे. काही ग्रा.पं. सदस्यांनी मनमानी करत दोन दिवसापूर्वी गावातील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे सांगत काम बंद केले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला फोन करून सेटींग करण्याचा प्रयत्न केला गेला. कंत्राटदारासोबत सेटींग झाली अन् काम दुसऱ्या दिवशीच सुरु झाले अशी माहिती आहे. आधीच अड्याळ ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने ग्रामपंचायत नावाजली आहे. कंत्राटदार ठरवतील तसे रस्ते निर्मिती आणि सिमेंटीकरणाचे कामे होत आहेत.
४० ते ६० टक्के निविदेत कमी दरात कामे होत असताना याला जबाबदार कोण? असा सवालही ग्रामवासीयांनी केला आहे. काही आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सुरु असलेल्या कामावर जायचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार न करता मिक्सींग करण्याचे धाडसत्र अड्याळ व परिसरात सुरु असलेल्या कामांवर सुरु आहे.
चौकशी करा अन्यथा आंदोलन
बी.आर.जी.एफ. व रोहयो अंतर्गत अशोक नगर ले आऊट मधील सिमेंट रस्ता, झोपडपट्टी येथील सिमेंट रस्ता मंडई पेठ येथील सिमेंट रस्ता, होळी चौक येथील सिमेंटी रस्ता तसेच अड्याळ येथे काही रस्त्याचे खडीकरण मुरुमीकरण झाले. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची ग्रामवासीयात आहे. झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामवासीयांनी निवेदनातून दिला आहे. (वार्ताहर)