शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

‘मिशन स्कॉलरशिप’ पॅटर्न जिल्हाभर राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 9:59 PM

घटकसंच नियोजनाचे प्रकाशन आमदार राजू कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांच्या उपस्थितीत बुधवार १ जुलै रोजी सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे होणार आहे.

ठळक मुद्देतुमसरमध्ये यशस्वी प्रयोग : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचाविण्यासाठी मिशन स्कॉरलशिप हा तुमसर पॅटर्न जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. गत सत्रात तुमसरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. लोकसहभाग आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचाविला जाणार आहे.गत शैक्षणिक सत्रात तुमसर तालुक्यात मिशन स्कॉरलशिप हा प्रयोग राबविण्यात आला होता. विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपयुक्त शिष्यवृत्ती परीक्षेचे घटकसंच तुमसरचे गटशिक्षणाधिकारी विजय आदमने व गटसंसाधन व्यक्तींनी तयार केला आहे. या घटकसंच नियोजनाचे प्रकाशन आमदार राजू कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप वाघाये यांच्या उपस्थितीत बुधवार १ जुलै रोजी सिहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे होणार आहे. या घटकसंच नियोजना पाचवी व आठवीसाठी प्रत्येक आठवड्यात कुठला घटक शिकवायचे याचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज शालेय वेळात दुपारी ३ ते ५ या कालावधीत शिष्यवृत्ती वर्ग या घटकांवर आधारित घ्यावयाचे आहे. दर पंधरवाड्याला एक सराव चाचणी झालेल्या घटकावर घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत केंद्रातील व बीट मधील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन नि:शुल्कपणे डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळात घेण्यात येणार आहे. यासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांची निवड गटशिक्षणाधिकारी स्थळावर करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पाच पेपर शाळास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत अनिवासी शिबिर घेतले जाणार आहे.लोकसहभागातून उपक्रममिशन स्कॉलरशिप या उपक्रमासाठी लोकसहभाग तेवढाच महत्वाचा आहे. शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या सहकाºयाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतीकडूनही या उपक्रमासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेतील टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुढाकार घेत आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा