दूध उत्पादकांचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:48+5:30

सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळले जातात. अनेक शेतकऱ्यांनी दुधाच्या व्यवसायातून समृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीतून काहीच हाती येत नसल्याने शेतकºयांची भीस्त दूध उत्पादनावरच असते. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाकडे दुधाळ जनावरे आहेत. परिसरातील शेतकरी किसान दूध संघ आणि खासगी संस्थांना दुधाची विक्री करते.

Milk producers get stuck | दूध उत्पादकांचे चुकारे अडले

दूध उत्पादकांचे चुकारे अडले

Next
ठळक मुद्देदिवाळी गेली अंधारात : शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांनी परिश्रमाने गोपालन करून विकलेल्या दुधाचे अद्यापही चुकाने मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. दिवाळीसारख्या महत्वाच्या सणालाही पैसे मिळाले नसल्याने शेतकºयात असंतोष पसरला आहे.
सिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळले जातात. अनेक शेतकऱ्यांनी दुधाच्या व्यवसायातून समृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीतून काहीच हाती येत नसल्याने शेतकºयांची भीस्त दूध उत्पादनावरच असते. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाकडे दुधाळ जनावरे आहेत. परिसरातील शेतकरी किसान दूध संघ आणि खासगी संस्थांना दुधाची विक्री करते. सर्वाधिक दुधाची विक्री किसान दूध संघ करीत आहे. या संघाला गावात दूध डेअरीच्या माध्यमातून शेतकरी दूध विक्री करीत आहेत. संघाने आतापर्यंत शेकडो लीटर दूध खरेदी केले. परंतु एप्रिलपासून दुधाचे चुकारेच दिले नसल्याची माहिती आहे. यामुळे शेतकरी अडचणी आले आहेत.
दिवाळीसारख्या सणाला चुकारे मिळतील, अशी आशा होती. परंतु दिवाळीतही शेतकºयांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. दुध संघाशी वारंवार संपर्क साधला. परंतु कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. आता शेतकरी आंदोलनाच्या तयारीत दिसत आहे.

शितगृहाची सुविधा नाही
दूध साठवणूक करण्यासाठी शितगृहाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले दूध तात्काळ विकावे लागते. याचाच फायदा दूध संघ घेत आहे. सिहोरा परिसरातील दूध उत्पादक प्रचंड संतप्त झाले आहेत. किसान दूध संघाने तात्काळ चुकारे दिले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे अडले आहे. यामुळे उत्पादक आणि शेतकरी संकटात सापडले आहे. चुकाºयासाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल.
-सुभाष बोरकर, तालुकाध्यक्ष भाजप किसान आघाडी.

Web Title: Milk producers get stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी