शिक्षक परिषदेचे लाक्षणिक उपोषण
By Admin | Updated: February 10, 2016 00:42 IST2016-02-10T00:42:58+5:302016-02-10T00:42:58+5:30
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले.

शिक्षक परिषदेचे लाक्षणिक उपोषण
आमरण उपोषण इशारा : वरिष्ठांना निवेदन
भंडारा : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, आ. चरण वाघमारे, शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी भोंगाडे व परिषद पदाधिकारी यांच्याशी आलेल्या चर्चेत १५ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करून मागण्या निकाली काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास १६ पासून आमरण उपोषणाचा इशाराही परिषदेतर्फे देण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे नागपूरला आले होते. ३ वा. त्यांची सुद्धा भेट घेण्यात आली. चर्चेदरम्यान त्यांनी नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक पारधी यांना निर्देश देत आमरण उपोषणाची पाळी येवू देऊ नका समस्या तात्काळ निकाली काढा असे स्पष्ट निर्देश दिले. शिक्षकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून शिक्षण विभागातर्फे संघटनेसोबत दोन महिन्यातून एकदा सहविचार सभा आयोजित केली जाते. मात्र शिक्षण विभाग केवळ या चर्चेला देखावा करते आणि सहजसोप्या समस्यांना किचकट करून कित्येक महिने समस्या निकाली काढत नाही.
या प्रलंबित मागण्या घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर सकाळी १०.३० पासून जिल्हाध्यक्ष आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. यात परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ.उल्हास फडके, जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे, अशोक वैद्य, के.के. बाजपेयी, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, राजेश निंबार्ते, राधेश्याम धोटे, राजेश बारई, हरिभाऊ पडोळे, संजय शिवनकर, पांडूरंग टेंभरे, महादेव साटोें, विजय करंडे, सशांक चोपकर, डी.आर. बोडखे, दिलीप वाणी, कांचन गहाणे, प्रदीप गोमासे, यादव गायकवाड, दिशा गद्रे, मनीषा काशिवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. मागण्यांमध्ये अनुकंपा तत्वावर सुहास चरणदास कान्हेकर यांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे, एन.आर. भोवते, प्रकाश विद्या. कारधा यांना सेवासंरक्षण व इतर लाभ, मनोहर हरडे सेवानिवृत्त गं्रथपाल यांना पेन्शनचे लाभ, एल.डी. फटे यांना सेवानिवृत्त वेतनलाभ, देवी सरस्वती विद्यालय, शिंगोरी या शाळेत जुन्या शिक्षकांचे समायोजन करणे, प्रदीप गोमासे, परशुरामकर यांना मुख्याध्यापक पदाची मान्यता, के.के. बाजपेयी यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने सेवानिवृत्तीचे लाभ इत्या. मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)