शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

विविध समस्या सोडविण्यासाठी 'मेस्टा'चे सीईओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:25 IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी माध्यमाप्रमाणेच किमान ३ ते ५ वर्षांची वर्धित मान्यता देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी माध्यमाप्रमाणेच किमान ३ ते ५ वर्षांची वर्धित मान्यता देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिले. अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.मेस्टाच्या शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष महेंद्र वैद्य, उपाध्यक्ष शत्रूघ्न भांडारकर, महिला अध्यक्ष अनुष्का खैरे व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी सूर्यवंशी यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा मेस्टाच्या मागण्यांच्या निवेदनात प्रामुख्याने सात मुद्यांवर भर देण्यात आला. त्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी माध्यमाप्रमाणेच (अनुदानित शाळांप्रमाणेच) किमान ३ ते ५ वर्षांची वर्धित मान्यता देण्यात यावी, आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रतीपूर्तीची रक्कम शिक्षण विभागाला प्राप्त होताच ती १५ दिवसांचे आत शाळांना नियमानुसार वितरीत करण्यात यावी, इंग्रजी शाळांना मिळणारी २५ टक्के प्रतीपूर्तीची रक्कम ही अनुदानाची रक्कम नाही. त्यामुळे याबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी तसेच याबाबतची माहिती ही माहितीच्या अधिकारात मोडत नसल्याने या संबंधिची माहिती कोणालाही देण्यात येऊ नये. ज्या गावात किंवा परिसरात इंग्रजी माध्यमाची मान्यताप्राप्त शाळा सुरु असेल त्या ठिकाणी अन्य दुसऱ्या संस्थेला परवानगी देण्यात येवू नये, शिक्षक व कर्मचारी पद भरतीसाठी पटसंख्येनुसार संचमान्यता दिली जाते. परंतु ही बाब इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू होत नसल्याने अशा शाळांना संचनमान्यतेची अट अनिवार्य करण्यात येवू नये, जि.प. शिक्षण विभाग (प्राथमिक) येथील २५ टक्के अंतर्गत प्रतीपूर्तीची सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला एक मदतनिस किंवा लिपीक देण्याची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी या शिष्टमंडळाशी समाधानकारकपणे वार्तालाप करून मेस्टाला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.