समर्थ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:35+5:302021-08-24T04:39:35+5:30
लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणीद्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ...

समर्थ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणीद्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, संस्था सदस्य मधुकर लाड, डॉ. उदय राजहंस, माजी प्राचार्य प्रा. आनंद खोलकुटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. कापसे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील जीवन जगत असताना या स्पर्धेच्या युगात स्वतः कसे टिकून राहावे, यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात आदिबा हर्षद पटेल, मोक्षद चोले, इरफान शेख, शील बागडे, अभिजीत मेश्राम, मीनल झलके, सुचिता राघोर्ते, मोनिका गायधने, कुलदीपक पुस्तोडे, वैष्णवी धांडे या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक अशोक गायधनी, योगराज डोर्लीकर, सुरेश केदार, पद्मजा कुलकर्णी, प्रशांत वंजारी, रीना साठवणे, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा. धनंजय गिरेपुंजे यांनी तर आभार डॉ. बंडू चौधरी यांनी मानले.