लाखनी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:47 IST2021-02-27T04:47:30+5:302021-02-27T04:47:30+5:30
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बापू हटेवार यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांचे प्रश्न ...

लाखनी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सभा
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बापू हटेवार यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पेटून उठणारी संघटना असून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावरदेखील निस्वार्थपणे शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नरत असते. शिक्षकांवर अन्याय होणार नाही, यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेण्यासाठीही मागेपुढे पाहणार नाही. काही संघटनांचे नेते मात्र बदलीसारख्या संवेदनशील बाबतीत खोटे प्रमाणपत्र सादर करुन स्वतःचा बचाव करतात. त्यामुळे इतर शिक्षकांवर अन्याय होत असतो. याचे मात्र त्यांना देणेघेणे नसल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या समस्यांची नोंद घेऊन त्यावर चर्चा केली. सूत्रसंचालन उमेश गायधने तर विठ्ठल हारगुडे यांनी आभार मानले.
सभेला अरुण कावळे, श्रीकांत बांते, सुरेश गिऱ्हेपुंजे, य. मो. गायधने, ईश्वरदास जांभूळकर, गौतम वाहाने, सुधाकर झोडे, आर. पी. वंजारी, गजीराम खंडाते, दादाराम वंजारी, जय राठोड, चंद्रकांत उरकुडे, घनश्याम चचाने, आर. एस. खोब्रागडे, रवींद्र म्हस्के, प्रमोद खेडीकर, गजानन झलके, भोजराम मांढरे, बाळासाहेब चव्हाण, रमेश गायधने, अशोक येळमे, लाकेश धरमसारे उपस्थित होते.