अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:08+5:302021-08-23T04:37:08+5:30

लाखांदूर (भंडारा) : आंतर जिल्ह्यातून दुचाकीने स्थानिक लाखांदूरात येऊन एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल ...

Mass abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

लाखांदूर (भंडारा) : आंतर जिल्ह्यातून दुचाकीने स्थानिक लाखांदूरात येऊन एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जंगल परिसरात नेऊन सामूहिक अत्याचार केला. ही घटना गत १९ ऑगस्ट रोजी सायंकाळ ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चिचोली जंगल परिसरात घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी युवकांविरोधात अत्याचार गुन्ह्यासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. समीर आबाजी शहारे (२२) व सूरज प्रभाकर मेश्राम (२१) दोन्ही रा. मालडोंगरी(ता. ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपी विनाक्रमांकाच्या दुचाकीने लाखांदूरात आले. दोघांनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवरून जंगल परिसरात घेऊन गेले. यावेळी मुलीवर अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलीने संबंंधित अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. सदर माहितीवरून तब्बल दोन दिवसांनंतर पीडित अल्पवयीन मुलीसह कुटुंबीयांनी गत २१ ऑगस्ट रोजी लाखांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तपास पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू व लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करीत आहेत.

Web Title: Mass abuse of a minor girl