मराठी शाळा बंद करण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:01 IST2018-10-29T22:01:26+5:302018-10-29T22:01:43+5:30
राज्याचे सरकार दिशाहीन झाले आहे. मुख्याध्यापकांनी शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. मुख्याध्यापकांचे बारीकसारीक प्रश्न मार्गी लागावे यासाठी काम केले पाहिजे. संघटनेने शक्ती उभी राहते. संघटन मजबूत करा. लोकाभिमुखी व्हा. मराठी शाळा बंद करण्याचा डाव उलथून पाडा, असे आवाहन राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडीकर यांनी केले.

मराठी शाळा बंद करण्याचा डाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : राज्याचे सरकार दिशाहीन झाले आहे. मुख्याध्यापकांनी शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. मुख्याध्यापकांचे बारीकसारीक प्रश्न मार्गी लागावे यासाठी काम केले पाहिजे. संघटनेने शक्ती उभी राहते. संघटन मजबूत करा. लोकाभिमुखी व्हा. मराठी शाळा बंद करण्याचा डाव उलथून पाडा, असे आवाहन राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडीकर यांनी केले.
भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची सभा येरली येथे फार्म हाऊसवर घेण्यात आली. त्यावेळी ते मुख्याध्यापकांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित होते. व्यासपीठावर विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप, संघटन सचिव अनील बाळसराफ, कार्याध्यक्ष अशोक पारधी, राजकुमार बालपांडे, गणपतराव टिचकुले, ए.पी. डोमळे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी विदर्भाचे सचिव सतीश जगताप म्हणाले, मुख्याध्यापकांना सातव्या वेतन आयोगात ५४०० ग्रेड पे देण्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक संघाने चर्चा करून बक्षी समितीला दिला. निवड श्रेणी बाबतही शासन सकारात्मक आहे. पुढील काळात माध्यम निहाय संच मान्यता केली जाणार आहे. २०१२-१३ च्या पायाभूत पदांना पटसंख्येच्या अटीवर संरक्षण दिले गेले आहे. मुख्याध्यापकांनी शासनाशी संघर्ष करण्यासाठी संघटना मजबूत करावी असे सांगितले. संघटनेची पायाभरणी तालुका पातळीवरून व्हावी, मुख्याध्यापकांना संघास जोडले गेले जावे असे विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी राजकुमार बांते, अविनाश डोमळे, अनील बाळसराफ, राजकुमार बालपांडे, मनोहर मेश्राम, मधुकर झलके, हरिदास भुरे यांचीही भाषणे झाली. सभेत नांदेड येथील राज्य अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत वरिष्ठ वेतन श्रेणी, संघटना बांधणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती, वर्धीत मान्यता, मार्गदर्शन शिबिर, तालुका व जिल्हा अधिवेशन या बाबत चर्चा करण्यात आली. संचालन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.एन. टिचकुले यांनी केले. आभार व्यक्त अनमोल देशपांडे यांनी केले. सभेला मुख्याध्यापक संघटनेचे नेते रामेश्वर लांडे, गोपाल बुरडे, खेमराज डोये, पद्माकर सिंगनजुडे, सुनील घोल्लर , दिलीप वासनिक, अरविंद काशिवार, शालीकराव चेटुले, उमेश पडोळे, विजय देवगिरीकर, पी.डी. मुंगमोडे, के.ए. पुप्पलवार, डी.एफ. काळे, एच.ए. सिंगनजुडे, प्रमोद मुडकुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.