जगात बोलली जाणारी मराठी भाषा
By Admin | Updated: February 28, 2017 00:28 IST2017-02-28T00:28:01+5:302017-02-28T00:28:01+5:30
मराठी भाषा संपूर्ण जगात बोलली जाणारी भाषा असून या भाषेचा गौरव करण्यासाठीच वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ...

जगात बोलली जाणारी मराठी भाषा
विकास ढोमणे : मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम
भंडारा : मराठी भाषा संपूर्ण जगात बोलली जाणारी भाषा असून या भाषेचा गौरव करण्यासाठीच वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य विकास ढोमणे यांनी केले.
मराठी भाषा विभाग, जे.एम. पटेल महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य कुसुमाग्रज जयंती निमित्त मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, कवियत्री विजया मारोतकर, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रा. विनी ढोमणे, प्रा. अर्चना शेष उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्त प्रदर्शनीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘संगणक व महाजालावरील मराठी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. निबंध स्पधेर्तील विजेत्यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात येणारे आकर्षक रोख पारितोषिक मान्ववरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक प्रविण सोनकुसरे, द्वितीय शुषुप्ती काळबांडे व तृतिय क्रमांक तितिक्षा रंगारी यांचा समावेश आहे. या दिनानिमित्त आयोजित स्पर्धा मध्ये तितिक्षा रंगारी प्रथम तर रोहीणी गणविर द्वितीय, काव्य स्पर्धेत रोहिणी गणविर प्रथम तर सविता मस्के द्वितीय तसेच कथाकथन स्पर्धेत गणेश खडसे प्रथम तर स्नेहल वैद्य द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या स्पधेर्कांचा बक्षिस देवून सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१३ संबंधी जाणीव जागृती कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मार्गदर्शनअतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर म्हणाल्या की, जिल्हयात १२ ते २० वर्ष वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहेत. पोगंडावस्थेत स्त्री-पुरुष यांच्यात आकर्षण असतो पण क्षणभंगूर आनंदामुळे स्वत:चे आयुष्य उदवस्त करु नये. हे वय स्वत:ला निर्माण करायचे आहे. मुलींनी प्रथम शिक्षण घ्यावे व स्वत: आत्मनिर्भर व्हावे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता स्वत:चे संयम कायम ठेवावे, अशा सूचना केल्या. यश प्राप्ती करा, समाजातील विघातक गोष्टीकडे न बघता विधायक गोष्टीकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘पोरी जरा जपून’ या काव्यमय व्याख्यानात कुसूमाग्रजांना सुंदर काव्यरुपी अभिवादन करुन प्रा. विजया मारोतकर म्हणाल्या की, जन्मजात असलेल्या कारणामुळे मुलांपेक्षा मुलींची काळजी घेणे आवश्यक आहे. मोबाईलमुळे मुलींच्या अत्यांचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे म्हणून पुरुषधारी समाजात मुलींनी सकारात्मक पाऊल उचलणे काळाची गरज आहे. घ्येयाच्या आधीच निर्णयाकडे वळल्यामुळे मुलींचे जीवन उध्वस्त होत आहे. मला आनंद आहे की, एक महिला असूनही मी चारोळी ते कादंबरी पर्यंत ग्रंथप्रवास केलेला आहे. आज महिलांनी पोळीच्या वर्तळापासून विमानाच्या चाकापर्यंत प्रवास केलेला असून मुली सर्व क्षेत्रात प्रगती पथावर आहेत. अनेक काव्यरुपी कथानकाद्वारे त्यांनी मुलींना होणाऱ्या अत्याचाराविषयी सल्ला दिला. प्रासताविक अर्चना शेष यांनी केले तर संचालन मराठी भाषा विभागाचे विभाग प्रमुख सु.ह. देशपांडे यांनी केले आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थींनी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)