दामदुप्पट योजनेत अनेकांना गंडविले
By Admin | Updated: September 11, 2014 23:17 IST2014-09-11T23:17:00+5:302014-09-11T23:17:00+5:30
पुणे येथील एका कंपनीचे एजंट असून ही कंपनी लक्षावधीचे कर्ज वितरीत करतो असे सांगून एजंटांनी सिहोरा परिसरातील ५० हून अधिक नागरिकांना गंडविले आहे. या एजंट विरोधात कुठलाही

दामदुप्पट योजनेत अनेकांना गंडविले
एजंटांचे गोंदिया कनेक्शन : सिहोरा परिसरात बोगस एजंट
चुल्हाड (सिहोरा) : पुणे येथील एका कंपनीचे एजंट असून ही कंपनी लक्षावधीचे कर्ज वितरीत करतो असे सांगून एजंटांनी सिहोरा परिसरातील ५० हून अधिक नागरिकांना गंडविले आहे. या एजंट विरोधात कुठलाही पुरावा नसल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे टाळण्यात येत आहे. अशी माहिती सुशिल कुंभारे यांनी दिली.
ग्रामीण भागात दाम दुप्पट योजना राबविणाऱ्या अनेक कंपन्यांचे एजंट सक्रीय झालेली आहेत. संबंधित व्यक्ती, नातेसंबंध आदींचा परिचय देत आहेत. कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभांची माहिती हे एजंट ग्रामीण जनतेला पटवून देत आहेत. अल्पावधीत राशी दुप्पट करण्यात येत असल्याने या एजंटांच्या जाळ्यात अनेक नागरिक ओढली जात आहे. या आधी एका महिलेने चक्क महिला बचत गटांना गंडविले आहे. नंतर ही महिला गोंदिया जिल्ह्यात पसार झाली आहे. या महिलेचा आजवर थांगपत्ता लागलेला नाही. बचत गटाकडे पुरावा नसल्याने महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही. या प्रकरणाची चर्चा शांत होत नाही.
अनेक नागरिकांना एका एजंटाने गंडविले असल्याचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील रहिवासी असल्याचे सांगून साई प्रसाद प्रॉपर्टी लिमिटेड पुणे या कंपनीत कार्यरत असल्याची माहिती या एजंटाने सिहोरा परिसरातील नागरिकांना दिली. आधी या एजंटाने नाते संबंधात असलेल्या आप्तस्वकीयांना दाम दुप्पट योजनेत गुंतवणूक करण्याचे सांगितले.
१ लक्ष रुपयाचे कर्ज प्राप्तीसाठी ४ हजार रुपये आणि ५० हजार रुपयासाठी २ हजार रुपये असे कर्जवाटपाची माहिती दिली. त्याप्रमाणे ५० हून अधिक नागरिकांनी या एजंटाकडे राशी जमा केली. एप्रिल महिन्यात राशी गुंतवणूक केली असताना एजंटाने कर्जप्राप्तीकरिता प्रयत्न केले नाही. फसवणूक करण्यात येत असल्याची बाब लक्षात येताच, तिरोडास्थित असलेल्या एजंटाचे घर नागरिकांनी गाठले. आज उद्या तुम्हाला कर्ज प्राप्त करून देतो. अशा हुलकावण्या देत या एजंटाने पाच महिन्याच्या कालावधीत साधा एक रुपयाहीनागरिकांना प्राप्त करून दिला नाही. यानंतर नागरिकांनी एजंटाच्या भ्रमणध्वनी क्रमांक अस्तित्वात नाही असे उत्तर प्राप्त होत असल्याने एजंटाने फसवणूक केल्याची खात्री नागरिकांची झाली आहे. या एजंटाचे घर गाठण्याचे नागरिकांनी सुरु केले आहे. गेल्या महिनाभरापासून एक एजंट घरीच राहत नाही. या एजंटाच्या बाबतीत सत्य माहिती सांगण्यात येत नाही. यामुळे एजंट लाखोंचा चुना लावून पसार झाल्याचे कळताच नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी काही पोलिसांना संपर्क साधला. परंतु या एजंटानेच फसवणूक केली असल्याचा पुरावा नागरिकांकडे नाही. यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळले आहे. नागरिकांनी न्याय मिळविण्याची अपेक्षा सोडली आहे. फसवणूकीत अनेक गरीब तथा सामान्य नागरिक अडकली आहेत. १३ कि.मी. अंतरावरील तिरोडा श्हरात एजंटाचे रोज घर गाठण्यात येत आहे. कर्ज प्राप्त करण्याचा विचार नागरिकांनी सोडला असून गुंतवणूक केलेली राशी परत प्राप्तीसाठी धाव घेण्यात येत आहे. परंतु प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती ‘लोकमत’ला सुशिल कुंभारे यांनी दिली आहे. (वार्ताहर)