बाळापूर खाणीला मॅग्नीज उत्खननाची हिरवी झेंडी

By Admin | Updated: July 27, 2015 00:39 IST2015-07-27T00:39:24+5:302015-07-27T00:39:24+5:30

डोंगरी बुज. (बाळापूर) खुल्या खाणीला उत्खनन करीता १.७१ हेक्टर जमीनीला वन व महूसल प्रशासनाने मंजूरी दिली.

Manganese quarrying green belt of Balapur mines | बाळापूर खाणीला मॅग्नीज उत्खननाची हिरवी झेंडी

बाळापूर खाणीला मॅग्नीज उत्खननाची हिरवी झेंडी

\१.७१ हेक्टरला परवानगी : वन, महसूल व पर्यावरण विभागाची मंजुरी
तुमसर : डोंगरी बुज. (बाळापूर) खुल्या खाणीला उत्खनन करीता १.७१ हेक्टर जमीनीला वन व महूसल प्रशासनाने मंजूरी दिली. सातपुडा पर्वत रांगात ब्रिटीशकालीन जगप्रसिध्द ही खाण आहे. खाणीतील वेस्टेज मटेरियल करीता ही परवानगी मिळाली आहे.
तालुक्यात भारत सरकारची जून्या ब्रिटीशकालीन मॅग्नीज खुली खाण डोंगरी बु. (बाळापूर हमेशा) येथे आहे. सातपुडा पर्वत रांगातील जंगलात ही खाण आहे. दिवसेंदिवस खाणीचे क्षेत्र विस्तारत आहे. जगप्रसिध्द मॅग्नीज येथे भूगर्भात आहे. परंतु खाणीचे क्षेत्र मर्यादीत होते. यासाठी मॅग्नीज ओर इंडिया नाग लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापकांनी खाणी जवळील १.७१ हेक्टर परिसरात उत्खननाची परवानगी मागितली होती. या तिन्ही विभागांनी डोंगरी बु. (बाळापूर हमेशा) मॉईल प्रशासनाला मॅग्नीज उत्खनन करण्याची नुकतीच परवानगी दिली.
येथे खाण परिसरातील शेतीमध्ये वेस्टेज मटेरियल टाकण्यात येत आहे. याची तक्रार स्थानिकांनी खाण प्रशासनाला केली होती. गावाच्या सभोवताल येथे कुरमुडा रस्त्याशेजारी वेस्टेज मटेरीयलच्या पर्वतासारख्या रांगा दिसून येतात.
या संपूर्ण परिसरात उच्च दर्जाचे मॅग्नीज भूगर्भात आहे. पर्यारण व महसूल विभागाने नियमानुसार रितसर परवानगी येथे दिली, पंरतु हे मटेरियलची विल्हेवाट नियमानुसार लावण्याची तितकीच गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

पर्यावरण मंत्रालयासोबतच वन व महसूल प्रशासनाने १.७० हेक्टरला नुकतीच परवानगी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या आदेश व नियमानुसार येथे कारवाई केली जाते.
- किशोर चंद्राकार,
मॉईल एजन्ट, डोंगरी, चिखला तिरोडी खाण

Web Title: Manganese quarrying green belt of Balapur mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.