पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी व्यवस्थापन गरजेचे
By Admin | Updated: February 7, 2015 23:19 IST2015-02-07T23:19:42+5:302015-02-07T23:19:42+5:30
प्रत्येक गावात जल सिंचन, कृषी सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याची गरज असते आणि त्याचा उपयोग नागरिक घेत असतात. प्रत्येक व्यक्ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. पाणी मिळविण्यासाठी

पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी व्यवस्थापन गरजेचे
भंडारा : प्रत्येक गावात जल सिंचन, कृषी सिंचन किंवा पिण्याच्या पाण्याची गरज असते आणि त्याचा उपयोग नागरिक घेत असतात. प्रत्येक व्यक्ती पाण्याशिवाय राहू शकत नाही. पाणी मिळविण्यासाठी नागरिक आवश्यक त्या उपायांचा मार्ग स्वीकारतात. भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळायचे असेल तर त्यासाठी मानवी व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
जल संसाधन नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालय, केंद्रीय भूजल बोर्ड नागपूर आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषदेच्यावतीने पार पडलेल्या भारत जल सप्ताह दरम्यान हमारा जल हमारा जीवन अभियानांतर्गत पाणी व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी अतिथी म्हणून सी.डब्लू.सी. नागपूरचे सहनिर्देशक के.के. पटेल, केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.भूषण लामसोगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मंजुषा ठवकर, भूजल विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.भुसारी, कार्यकारी अभियंता देशमुख, कृषी अधिकारी चलवदे, कार्यकारी अभियंता आर.एच. गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे, कृषी विकास अधिकारी एस.हस. किरवे उपस्थित होते.
कार्यशाळेत पाणी हेच जीवन या विषयावर कार्यकारी अभियंता आर.एच. गुप्ता यांनी चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कृषी विभागाशी संबंधित बाबींवर पाणलोट व कृषी सिंचन या विषयावर कृषी अधिकारी आर.बी. चलवदे यांनी, कनिष्ठ भू वैज्ञानिक मंगरूळकर यांनी ग्रामस्तरीय पाण्याचे ताळेबंद या विषयावर मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत निलजची जलग्राम म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान केंद्रीय भूजल बोर्डचे भूवैज्ञानिक डॉ.भूषण लामसोगे यांनी जलग्रामबाबत वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात यावा, विहिरी, बोअरवेल, मालगुजारी तलाव अन्य स्त्रोतांची निगा राखावी, पाण्याच्या पातळीचा गुणवत्ता सर्व्हेक्षण असावे, पाण्याचे मोजमाप करून पाण्याचा ताळेबंद करावा आदींसह शासनाच्या निकषानुसार तेरा मुद्यांच्या गोष्टी करण्याबाबत डॉ.लामसोगे ठळक बाबी सांगितल्या. (शहर प्रतिनिधी)