शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ताेतया आयकर अधिकाऱ्याने घातला सराफाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 17:57 IST

आयकर अधिकारी असल्याचे सांगत एकाने भंडाऱ्यातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवले. ही लुट त्याने ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून केली.

ठळक मुद्देसाेन्याची खरेदी : ऑनलाईन पैसे पाठविलाचा स्क्रीन शाॅट बनावट

भंडारा : आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून साेने खरेदी करून भंडारा शहरातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालण्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी भंडारा येथील अनादिनारायण ज्वेलर्समध्ये घडली. याप्रकरणी भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील मेन लाईनमध्ये कमला हाऊसमध्ये अनादिनारायण ज्वेलर्स आहे. करण नितीन साेनी यांचे हे सराफा दुकान आहे. गुरुवारी २ वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानात एक व्यक्ती आला. त्याने आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगितले. साेने खरेदी करायचे आहे, असे सांगत त्याने साेन्याची चेन व अंगठीची पाहणी केली.

साेन्याची चेन व दाेन अंगठ्या वजन २७.४९ ग्रॅम खरेदी केल्या. एकूण किमतीपैकी एक लाख ८० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून करण साेनी यांच्या माेबाईलवर पाठविले. पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅटही दाखविण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून २५.४९० ग्रॅम साेन्याची चेन देण्यात आली तर अंगठ्या रविवारी घेऊन जाईन, असे सांगितले. खरेदीचे बिलही रविवारीच घेऊन जाईल, असे सांगून ताे निघून गेला.

काही वेळाने साेनी यांनी आपल्या अकांऊंटंटचे स्टेटमेंट चेक केले असता, त्यात काेणतीच रक्कम जमा झाली नसल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याचा शाेध घेतला, परंतु ताे आढळून आला नाही. अखेर रात्री भंडारा पाेलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. त्यावरून पाेलिसांनी ताेतया आयकर अधिकारी संताेष पी. अशा नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणुकीचा नवा फंडा

माेबाईल ॲपच्या माध्यमातून पैशाची ऑनलाईन देवाणघेवाण माेठ्या प्रमाणात केली जात आहे. वेळेची बचत आणि कॅशलेस व्यवहार हाेत असल्याने अनेक जण याचा उपयाेग करतात. मात्र आता पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून लुटण्याचा हा नवा फंडा भंडारा शहरात उघडकीस आला. पाेलीस आता या भामट्याचा शाेध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइनtheftचोरीfraudधोकेबाजी