शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्याचा वाढदिवस, घरच्यांची जोरदार तयारी... अन् आज त्याने डोळे कायमचे मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 16:11 IST

उद्या बाबांचा वाढदिवस म्हणत तयारीसाठी लागलेली पोरं, घरात आनंदाच वातावरण असतानाच अचानक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वाढदिवसाच्या एक दिवसाआधीच रोशनचा मृत्यू झाल्याने घरच्यांना मोठा धक्का बसला.

ठळक मुद्देवाढदिवसाच्या १ दिवसाआधी तरुणाचा मृत्यू

भंडारा : ३० डिसेंबर आपला वाढदिवस आहे. तो घरच्या लहान मुलांसोबत साजरा करणार, असे ठरले असतानान एक दिवस अगोदर कोंढा येथील एका तरुणाचा बाथरुममध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. रोशन श्रीकृष्ण नान्हे (३०) रा. कोंढा असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

रोशन हा ग्रामपंचायत कोंढा येथे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होता. त्याचे वडील श्रीकृष्ण नान्हे ग्रामपंचायत कोंढा येथे दीर्घकाळसेवा देऊन परिचर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मुलास रोजगार सेवक म्हणून नियुक्त केले होते. काही दिवसांपासून रोशनला लिव्हरचा आजार जडला होता. त्यावर औषधोपचार सुरू होते. काल घरच्या लोकांना ३० तारखेला वाढदिवस साजरा करण्याचे सांगितले होते. कुटुंबिय तयारीत व्यस्त होते. सर्वांनी मिळून आनंदात वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅक करत होते. पण, आनंदाचा हा क्षण अचनाक दु:खात परिवर्तीत झाला. 

बुधवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रोशन लघुशंकेला गेला असता तिथेच चक्कर येऊन पडला. श्वास घेण्यास अडचण होत असल्याने डॉक्टरांना बोलावले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मागे आईवडील, भाऊ, पत्नी, ४ वर्षे वयाचा मुलगा आणि ९ महिन्याची मुलगी आहे. कमावता मुलगा अचानक मृत्यू पावल्याने नान्हे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHealthआरोग्यAccidentअपघात