मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:08+5:30

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन महत्वाचे आहे. विद्यार्थी व पालक एकत्र येवून आपल्या मुलांच्या कलागुणांना व अविष्काराला प्रोत्साहन देतात. मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करणे आवश्यक असल्याचे विचार विशाल तिरपुडे यांनी व्यक्त केले.

Make the learning goals fun by entertaining | मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करावे

मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करावे

ठळक मुद्देविशाल तिरपुडे : लाखनी येथील गुरुकुल स्कूलचे स्नेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन महत्वाचे आहे. विद्यार्थी व पालक एकत्र येवून आपल्या मुलांच्या कलागुणांना व अविष्काराला प्रोत्साहन देतात. मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करणे आवश्यक असल्याचे विचार विशाल तिरपुडे यांनी व्यक्त केले.
तारांकीत बहुउद्देशिय शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कुलद्वारे एक दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश बांते, अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत निंबार्ते, रजनी पडोळे, तारांकीत शिक्षण संस्थेचे सचिव विशाल तिरपुडे, माजी सरपंच राजेश खराबे, ग्रामपंचायत सदस्य सुस्मिता खराबे, सविता गौरे, प्रिया खंडारे, माधवी बावनकुळे, शांता भोस्कर, दुर्गेश चोले, शिल्पा बावनकुळे, भाग्यश्री कमाने, सुहास बोरकर, राजेश बडघरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नर्सरी, केजी - १, २ च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. तिरपुडे यांनी लहान मुलांचे इंग्लीश स्कुलची सुरुवात करून वडीलांच्या स्वप्नाची परिपूर्ती केल्याचे सांगितले. उद्घाटकीय भाषणात बांते यांनी गुरुकुलने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे शिक्षण देऊन संस्कारक्षम करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात निंबार्ते यांनी शाळेने उत्तरोत्तर प्रगती करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन जैना तिरपुडे यांनी केले. प्रास्ताविक हर्षा गायधनी व आभार प्रदर्शन मनीषा तिरपुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलू मेश्राम, निशा निर्वाण, वैशाली हंबरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Make the learning goals fun by entertaining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा