शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

‘त्या’ मुख्य सूत्रधाराला अटक

By admin | Updated: April 2, 2015 01:03 IST

‘डॉली की डोली’ या हिंदी चित्रपटात वधू लग्न झाल्यानंतर रात्री दागिने व नातेवाईकांसोबत पळ काढते.

तुमसर : ‘डॉली की डोली’ या हिंदी चित्रपटात वधू लग्न झाल्यानंतर रात्री दागिने व नातेवाईकांसोबत पळ काढते. येथे दिवसाढवळ्या मंदिरातून वधूने बनावटी नातेवाईकांसोबत पळ काढला होता. असाच प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला. या प्रकरणात वधूच्या बनावटी नातेवाईक (मुख्य आरोपी) तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे. वधू फरार असून येथे वधूची आई, वडील व मामासुद्धा बनावट असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी तथा वधू व इतरांविरुद्ध पोलिसांनी भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.१८ मार्च रोजी तुमसर येथील बारेलाल अहीरवार यांचे लग्न तिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील तरुणीशी नवेगाव येथील संतोषी माता मंदिरात झाला होता. विवाहानंतर एका तासानंतर वधू व तिच्या नातेवाईकांनी दागिन्यांसह पळ काढला होता. फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्यांनी तुमसर पोलीस ठाणे गाठले होते. घटना तिरोडा तालुक्यातील असल्यामुळे तिरोडा येथे तक्रार करण्याचे सांगण्यात आले होते. तिरोडा पोलिसात दोन दिवसापूर्वी वधू व तिच्या साथीदारांची तक्रार देण्यात आली. तिरोडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यात मुख्य आरोपी धनराज राहांगडाले रा.विहिरगाव याला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीने वधूचे नातेवाईक बनावट असल्याची माहिती दिली. त्यात बनावटी आईवडील, मामांचा समावेश आहे. सध्या वधू फरार आहे. मुख्य आरोपी धनराज राहांगडाले याची पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. फरार आरोपींचा कसून शोध सुरु आहे. तिरोडा तालुक्यात अशी टोळी सक्रीय असल्याचे समजते. मुख्य आरोपी धनराज राहांगडाले याला पोलिसांनी बोलते केल्यावर त्याने ५० हजार रुपये खर्च केल्याची कबुली दिली. पुढे तपासात गुढ उकलण्याची येथे शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)