रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:03 AM2019-10-15T01:03:14+5:302019-10-15T01:05:35+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वाकेश्वर, रावणवाडीसह परिसरातील लाखो शेतकºयांना बसतो आहे.

The main canal of Ravanwadi reservoir fled | रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्याला भगदाड

रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्याला भगदाड

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संघर्ष सुरुच : दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/वाकेश्वर : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वाकेश्वर, रावणवाडीसह परिसरातील लाखो शेतकºयांना बसतो आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याचा पाटबंधार विभागाकडे सातत्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी संघर्ष सुरू आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने शेतकºयांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. रावणवाडी जलाशयाच्या मुख्य कालव्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका अनेक शेतकऱ्याना यापूर्वीही बसला आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. कालव्याची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी कालव्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाणी तेथेच मुरले जाते तर मोठ्या प्रमाणात पाणी शेतशिवारात इतरत्र पसरत आहे.परंतु शेतकऱ्यानी तक्रार करुनदेखील कर्मचारी फिरकले नसल्याने पाण्याचा अपव्यय आजही सुरुच आहे.
वाकेश्वर येथील शेतकरी रवी हलमारे, कार्तिक मस्के, शंकर हटवार, नितेश मस्के यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही कालव्याची दुरूस्ती होवू शकली नाही. ऐन हंगामात पाण्याची गरज असताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय सुरु असल्याने गावकºयांनी मार्ग काढण्याचे ठरवले.
न्याय न मिळाल्याने वाकेश्वर येथील गावकºयांनी लोकवर्गणीतून कालव्याची दुरुस्ती केली आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करुन जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवते तर दुसरीकडे गावकरी सहकार्यासाठी तयार असतानाही कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
शेतकºयांनी अधिकाºयांकडे तक्रार केली आहे. अधिकाऱ्यानी मात्र याकडे लक्ष न दिल्याने अद्यापही रावणवाडी कालव्याची दुरूस्ती होवू शकलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांचे धान पीक एक-दोन पाण्यामुळे दरवर्षीच वाया जाते. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता सदर कालव्याची दुरूस्ती आता होवू शकत नसल्याचे सांगून वरिष्ठांना कळवू, असे त्यांनी सांगितले.

तलावाला लागून शेती असतांना देखील माझ्या शेतीला गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पोहचत नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय आजही होत आहे. पाणी न मिळाल्यास आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत.
- रवि हलमारे, प्रगतशील शेतकरी वाकेश्वर.


मी काही दिवसांपूर्वी रूजू झाले आहे. सद्यस्थितीत काम करणे अशक्य आहे. कालव्याशेजारी असणाऱ्या मोठ्या झाडांमुळेच कालव्याची दुरवस्था झाली असल्याने याबाबत वनविभागाला कळविले आहे.
- एन.एन. कांबळे, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, भंडारा

Web Title: The main canal of Ravanwadi reservoir fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.