शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

ओबीसी जनगणनेसाठी जिल्हा कचेरीसमोर महाधरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

देशात १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसींचे आर्थिक, शैक्षिणक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती रोखण्याचे कार्य केले जात आहे. विविध आयोगांची स्थापना करूनही ओबीसींना न्याय मिळाला नाही. यासाठी आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी गत काही महिन्यांपासून केली जात आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी भंडारा येथे महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. 

ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : ओबीसी जनगणना परिषदेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर त्रिमूर्ती चौकात शनिवारी दिवसभर धरणे देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी जनगणना परिषदेने केले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.देशात १९३१ नंतर आजपर्यंत ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसींचे आर्थिक, शैक्षिणक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगती रोखण्याचे कार्य केले जात आहे. विविध आयोगांची स्थापना करूनही ओबीसींना न्याय मिळाला नाही. यासाठी आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी गत काही महिन्यांपासून केली जात आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी भंडारा येथे महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात ओबीसी जनगणना परिषदेचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, भगीरथ धोटे, पांडुरंग फुंडे, मुरलीधर भर्रे, के.झेड. शेंडे, गोपाल सेलोकर, भय्याजी लांबट, बाळकृष्ण सार्वे, ईश्वर निकुडे, गोपाल देशमुख, वामन ठवकर, तुळशीराम बोंद्रे, अज्ञात राघोर्ते, प्रभू मने, मंगला वाडीभस्मे, आनंदराव उरकुडे, मनोज बोरकर, मंजूषा बुरडे, वृंदा गायधने, पंकज पडोळे, श्रीधर उरकुडे, उमेश सिंगनजुडे, डॉ. आशिष माटे, दिलीप ढगे, ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते, ललिता देशमुख, अल्का नखाते, रोहिणी वंजारी, अशाेक पारधी, अरविंद कावळे, लेखाराम मेंढे यांच्यासह शेकडो स्त्री, पुरुष सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संविधानाच्या ३४० व्या कलमाची अंमलबजाणी करावी, एससी, एसटीप्रमाणे ओबीसींना लाभ मिळावा, शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती