शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

देवनारा नदीपात्रातून यंत्राने रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 9:39 PM

अवैध व नियमबाह्य रेतीचा उपसा व वाहतूक होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने अतिशय कडक नियम तयार केले, परंतु कर्तव्याअभावी रेती कंत्राटदारांचे चांगभले सुरू असून तुमसर तालुक्यातील देवनारा नदीपात्रात जेसीबीने सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे.

ठळक मुद्देनदीपात्रात ट्रकांच्या रांगा : नियमांची पायमल्ली, नदीपात्र खड्डेमय

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अवैध व नियमबाह्य रेतीचा उपसा व वाहतूक होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने अतिशय कडक नियम तयार केले, परंतु कर्तव्याअभावी रेती कंत्राटदारांचे चांगभले सुरू असून तुमसर तालुक्यातील देवनारा नदीपात्रात जेसीबीने सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. नदी पात्रात जेसीबीने ट्रकमध्ये रेती भरली जात आहे. बावनथडी नदीपात्र खड्डेमय बनले आहे. कुणाच्या आशिर्वादाने नियमबाह्य कामे सुरू असल्याचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.तुमसर मुख्यालयापासून ४५ कि़मी. अंतरावर आदिवासी बहुल गाव देवनारा आहे. देवनारा गावाजवळून बावनथडी नदी वाहते. महसूल प्रशासन सदर रेतीघाट लिलाव केला. मध्यप्रदेशाची सीमा येथे प्रारंभ होते. अगदी कमी ब्रास रेतीचा लिलाव करण्यात आला होता. देवनारा व चिखली येथील ग्रामस्थांनी रेती तस्करीची तक्रार केली आहे. देवनारा नदीपात्रात जेसीबी घालून रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. नदी पात्रात सरळ ट्रक नेले जातात. जेसीबीने रेती ट्रकमध्ये भरली जाते. नियमबाह्य रेतीचा उपसा करतानी ग्रामस्थांनी व्हीडीओ चित्रीकरण केले. त्याची माहिती महसूल प्रशासनाला दिली, परंतु संबंधितावर अद्याप कारवाई झाली नाही.नदीपात्रात यंत्र घत्तलता येत नाही. रेतीचे उत्खनन करता येत नाही. ११ सप्टेंबर रोजी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी चित्रीकरण केले. लोकमत प्रतिनिधीला चित्रिकरण व फोटो पाठविल्या या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली.तुमसर येथे उपविभागीय अधिकाऱ्याचे कार्यालय आहे. नियमानुसार कामे केली जातात असे कार्यालयाकडून नेहमी सांगितले जाते. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी गावात आहेत. यंत्राने रेती उत्खनन करतानी अधिकाºयांना दिसत नाही. ग्रामस्थांना मात्र दिसत आहे. हा संशोधनाचा विषय आहे. पर्यावरणाला येथे निश्चितच धोका निर्माण झाला आहे.बावनथडी नदी खड्डेमय झाली आहे. मध्यप्रदेशाची सीमा नदीपात्राच्या मध्यभागातून सुरू होते. मध्यप्रदेशातून रेतीचा उपसा झाला असे सांगण्यात येत आहे. रेती व्यवसाय करणारे व ग्रामस्थ यांच्यात संघर्षाची शक्यता नाकारता ये त नाही. महसूल प्रशासनाने येथे दखल घेऊन कारवाईची गरज आहे. संबंधितावर कारवाईची मागणी माजी पंचायत समिती सदस्य प्रमा पेंदाम, सुभाष धुर्वे, रोशन सावतवाल, मनोहर निनावे, ललन शुक्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.कारवाईसाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरजनगदी पैसा, बेरोजगारी व स्वत:चा दबदबा यामुळे तुमसर तालुक्यातील असामाजिक तत्वांनी रेती व्यवसायाकडे धाव घेतल्याची माहिती आहे. महसूल विभाग येथे कारवाई करीता हतबल दिसत आहे. पोलीस संरक्षणात कडक कारवाईची गरज आहे. केवळ नियम तयार करून काहीच फायदा नाही. प्रत्यक्ष कारवाई करिता वरिष्ठ अधिकाºयांच्या रूपात सिंघम अधिकाºयाची गरज आहे.