भंडाऱ्यात ‘लव्ह द की टू आॅपटिमिझम’चे विमोचन
By Admin | Updated: September 21, 2015 00:31 IST2015-09-21T00:31:34+5:302015-09-21T00:31:34+5:30
जगातील १३२ देशात आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ३७४ पाने असलेली ‘लव्ह द की टू आॅपटिमिझम’ या इंग्रजी पुस्तकाचे विमोचन भंडारा येथे करण्यात आले.

भंडाऱ्यात ‘लव्ह द की टू आॅपटिमिझम’चे विमोचन
भंडारा : जगातील १३२ देशात आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ३७४ पाने असलेली ‘लव्ह द की टू आॅपटिमिझम’ या इंग्रजी पुस्तकाचे विमोचन भंडारा येथे करण्यात आले. जिल्हा मराठी पत्रकार संघात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, उपाध्यक्ष राकेश चेटुले, संघाचे सहसचिव काशिनाथ ढोमणे व माजी जि.प. सदस्य प्रमोद गभणे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त पॉझिटीव्ह विचार ठेवणे आवश्यक आहे. प्रेम म्हणजे आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी जे पैसे खर्च केले, त्या पैशाचे मूल्य जाणून त्यावर प्रेम करणे, हे आहे. जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगावर कसे मात करावे हे या पुस्तकातील ४२ धड्यातून सांगितले आहे. (प्रतिनिधी)