कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
By Admin | Updated: October 11, 2014 23:00 IST2014-10-11T23:00:26+5:302014-10-11T23:00:26+5:30
भंडारा व गोंदिया जिल्हयात नियमाची पायमल्ली होत असून महाराष्ट्र सरकारनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतांना शहरी व ग्रामीण भागात असेच प्रकार सुर ुआहेत.

कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
गोंडउमरी (रेल्वे) : भंडारा व गोंदिया जिल्हयात नियमाची पायमल्ली होत असून महाराष्ट्र सरकारनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतांना शहरी व ग्रामीण भागात असेच प्रकार सुर ुआहेत.
कर्मचारी अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याचे ओरड ग्रामीण व शहरी भागात होत आहे. या मुख्यालयात न राहणाऱ्या अधिक संख्येत असुन प्रत्येक अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केली असून आपल्या क्वॉर्टर वरती कुणीच अधिकारी राहत नाही असेच चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसुन येत आहेत.
साकोली तालुक्यात गोंडउमरी सर्कल वडद पासुन एकही कर्मचारी स्थानिक राहत नाहीत. याला जबाबदार वरिष्ठ अधिकारी वर्ग आहे. ग्रामीण भागात, पहिला कर्मचारी, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी मुख्याध्यापक, गावाचा सेवक- ग्रामसेवक, रुग्णाचा सेवक-वैद्यकिय अधिकारी, महसूल सेवक-तलाठी, शेताची डॉक्टर- कृषि सहायक, पैसाच देवाण-घेवाण करणारे कॅशियर, मॅनेजर बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, नर्स, बस सेवक, सा.व विभागाची कर्मचारी यासारखे अन्य कर्मचारी अधिकारी वर्ग हे ये-जा करीत आहे. शासनाच्या आदेशाला नजुमानता कर्मचारी, अधिकारी तालुका किंवा जिल्हयाच्या ठिकाणाहून ये-जा करतात. हे सर्व शासकिय कर्मचारी मुख्यालयी न राहता स्थानिक नागरिकांकडून मुख्यालयात राहत असल्याचे खोटे दाखले घेतात. (वार्ताहर)