हे कसले सोशल डिस्टंसिंग तपासणी आणि अहवालासाठी लांबच लांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:36+5:302021-03-28T04:33:36+5:30
बॉकस सावधान धोका अद्याप कमी झालेला नाही.... जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी ...

हे कसले सोशल डिस्टंसिंग तपासणी आणि अहवालासाठी लांबच लांब रांगा
बॉकस
सावधान धोका अद्याप कमी झालेला नाही....
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाचे संकट टाळण्यासाठी शपथ घेण्याची गरज आहे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर, फिजिकल डिस्टंन्सिग गोष्टींचा वापर केल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो हे माहीत असूनही अनेक जण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र जेव्हा कोरोना संसर्ग होतो तेव्हा काय यातना भोगाव्या लागतात, कुटुंबाचे काय हाल होतात. याचा अनुभव कोरोनातून बाहेर पडलेल्यांना विचारल्यास काहीही करा मात्र बेफीकीर राहू नका असाच असल्ला अनेकजण देतात याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
कोट
जिल्हा रुग्णालयात मी तपासणीसाठी आलो होतो मात्र येथे असणारी लांबच लांब रांग पाहून आपला कधी नंबर लागेल असे मनात चित्र उभे राहिले. यासोबतच येथे पाठीमागून येणाऱ्यांचाही अगोदर नंबर लागत आहे. त्यामुळे माझ्यासह वयोवृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आरोग्य कर्मचारीही सरळ बोलत नाहीत.
विवेक मेश्राम, नागरिक, भंडारा
जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणीसाठी आलो होतो. मात्र येथे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. एकीकडे रांगेत ताटकळत उभे राहावे लागते तर दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणाची गणूक मिळत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे. याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चंदन वाघाये, नागरिक, खोकरला.