शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ने केला स्त्री शक्तीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:36 IST

लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील जलाराम सभागृहात सखी सन्मान अवार्ड तथा बहारदार नृत्य व गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसखींचा उदंड प्रतिसाद : सात क्षेत्रांचा समावेश, जीवन गौरव, बहारदार गाणी व नृत्यांचा नजराणा

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील जलाराम सभागृहात सखी सन्मान अवार्ड तथा बहारदार नृत्य व गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने स्त्री शक्तीचा सन्मान केला.कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमतचे संस्थापकीय संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. उद्घाटन मिनरव्हा ज्वेलर्सचे संचालक अंकुर जैन, वृशाली जैन, सोनालिका ट्रॅक्टर व महिन्द्रा टूव्हिलर चे संचालक सदानंद निपाणे, राहुल हुमने, स्कायवर्ड इंटरनॅशनल स्कुल (पिंपळगाव) च्या सचिव सोनाली काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून लक्ष फाऊंडेशनच्या संचालिका ज्योती दुबे आॅर्केस्ट्रा निखिल सरगमचे संचालक, नगरसेवक संजय कुंभलकर, नितीन धकाते, आशु गोंडाणे, भरत मल्होत्रा, अरविंद लांजेवार, न.प.सभापती जयश्री बोरकर, वनिता कुथे, लोकमत कार्यालय प्रमुख मोहन धवड, युवा प्रतिनिधी योगेश पडोळे उपस्थित होते.सखी सन्मान अवार्ड अंतर्गत सात क्षेत्रात व जीवन गौरव अवार्ड देण्यात आला. जिल्हाभरातून या पुरस्कारांसाठी सर्व गटातून एकूण ५० महिलांनी अर्ज केले होते. तज्ञ परिक्षकांकडून परीक्षण करण्यात आले. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सखी सन्मान अवार्ड प्रदान करण्यात आला.प्रसिध्दीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणून विविध क्षेत्रात कार्य करणाºया या महिलांच्या असाधारण कर्तृत्वाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला. सामाजिक साहित्य व कला, क्रीडा, उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक, वैद्यकिय, शौर्य आदी सात क्षेत्रांचा समावेश होता. याशिवाय दुसºयासाठी आयुष्यभर झटणाºया स्त्रीचा सखी सन्मान जीवनगौरव हा पुरस्कारही देण्यात आला. सखी सन्मान सोहळ्याचे निवेदन विक्रम फडके यांनी केले. गुणात्मक शिक्षणासाठी सकारात्मक काम करणाºया लोकांनीच शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. वंचित व उपेक्षीतांना शिक्षण मिळावे तसेच शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने काही शिक्षक नेहमीच अग्रणी असतात. शिकाल तर टिकाल या म्हणीप्रमाणे शिक्षण हेच यशस्वी जीवनाचे सुत्र आहे. अशी विचारधारा आत्मसात करुन विद्यार्थ्यांसाठी झटणाºया ‘देवयानी हुमणे’ यांना शैक्षणिक क्षेत्रात सखी सन्मान अवार्ड देवून गौरविण्यात आले.व्यवसाय हा स्वत:पुरती मर्यादित न ठेवता तो लोकापर्यंत कसा पोहोचेल व आपल्याबरोबर सगळयांना रोजगार कसा मिळेल याच विचाराने सतत कार्यरत असणाºया सुष्मा नागदेवे यांना उद्योग व व्यावसायीक क्षेत्रात सखी सन्मान अवार्ड देऊन गौरविण्यात आले.डॉक्टर व रुग्ण यांच्यामधील दुवा म्हणून परिसेविका कार्य करीत असतात. रुग्णांची संपूर्ण जबाबदारी घेऊन ते लवकर बरे होणार अशी सकारात्मक विचारधारा ठेवून त्यांना हिंमत देऊन हसतमुखाने त्यांची सेवा करणाºया वत्सला मानमोठे यांना वैद्यकिय क्षेत्रात सखी सन्मान अवार्ड देवून गौरविण्यात आले.कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाही क्रीडा क्षेत्रात महिलांनी घवघवीत यश संपादन करुन आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर हॅन्डबॉल, बास्केट बॉलमध्ये भंडाराचे नाव नेणाºया तसेच छत्रपती अवार्ड ने वंदना साकुरे यांना क्रीडा क्षेत्रातील सन्मान बहाल करण्यात आला.साहित्य व कला समाजाच्या विविध घटकांना समाजासमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. महाराष्टÑाने साहित्य व कलेच्या क्षेत्रात भरभरुन योगदान दिले आहे. विदर्भात कलेला, साहित्याला महाराष्टÑाच्या पटलावर प्रस्तुत करण्यात आले नाव अग्रणी आहेत. या क्षेत्रात ज्यांनी जिल्ह्याचे नाव रोशन केले अशा डॉ. रसिका गोंधुळे यांना साहित्य व कला क्षेत्रात सखी सन्मान अवार्ड देऊन गौरविण्यात आले.आजच्या काळात महिला या अबला किंवा कमजोर नसून शौर्याने आलेल्या प्रसंगाला सामोरे जातात. समाजात असलेल्या अनिष्ट गोष्टींना स्त्री आपल्या सामर्थ्याने थांबवू शकते अशाच एक बसचालक ज्यांनी प्रवासी क्षेत्रात महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या तेव्हा लगेच बस थांबवून त्या स्त्रीची स्वत: सुषृशा केली. बाळ व माता दोघांचाही जीव वाचविला. अशा करुणा गोंडाणे यांना शौर्य क्षेत्रात सखी सन्मान अवार्ड देऊन गौरविण्यात आले.समाजसेवा हिच ईश्वरसेवा अशा विचार धारा असलेल्या एक ना अनेक संस्थेशी कार्यरत असलेल्या समाजासाठी झटणाºया तसेच सखी मंच, लाईनेस क्लबच्या अध्यक्षा माजी ग्राम सदस्य संगिता सुखानी यांनी सामाजिक क्षेत्रात सखी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सखी मंच, असो की समाज, त्या अविरत सतत कार्य करीत असतात. त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्याची दखल घेऊन मंगला डहाके यांना जीवन गौरव अवॉर्ड प्रदान करण्यात आला. तसेच भंडारा शहरातील विभाग प्रतिनिधींना गिफ्ट देवून सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शहरातील सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाºया मंदा पडोळे यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच संध्या रामटेके व पहेला येथील यामिनी बांडेबुचे यांना स्मृतचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपस्थितांसाठी खास गितांचा बहारदार नजराणा सादर करण्यात आला त्यात राहुल हुमणे यांनी २६/११ च्या शहीद दिनानिमित्त ‘मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाया’ या गिताने शहिदांना श्रध्दांजली अर्पित केली. यानंतर एकापेक्षा एक सरस गितांची महफिलच रंगली . त्यात ‘एक प्यार का नगमा है, याड लागल र याड लागल’, सलोनी क्षिरसागर हिने नुसरत फते अली खॉ व लता मंगेशकर यांनी रचनाबध्द केलेले ‘तेरे बिन नही लगदा दिल मेरा ढोलना’ या गिताने प्रेक्षकांची मने जिंकली. जियाकत खान यांनी प्रेक्षकांना ७० व ८० च्या दशकात नेले. त्यांनी ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘ये रेशमी जुल्फे’, ‘बदन पे सितारे लपेटे हुए’, ‘ये चाँद सा रोशन चेहरा’, व ‘छुप गए सारे नजारे’ या गितांनी प्रेक्षक मोहुन गेले. वहाब खान यांनी ‘भौरे की गुंजन’ ‘लिखे जो खत तुझे’, ‘तुमने मुझे देखा व ‘इशारो इशारो मे’ हे गित सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळविली.सपना गोस्वामी हिने ‘मेरे रश्के कमर’ व ‘ऐ मेरे हमसफर’ तसेच ‘आजकी रात होता है जो’ या गिताने सभागृहात एकच समा बांधला. सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. त्यात अश्विन बन्सोड यांनी भरतनाट्यम प्रकारात गणेश वंदना सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. गिता पवनकर हिने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रविण उके व पुनम हटवार यांनी राधा-क्रिष्णाच्या नृत्याने संपूर्ण वातावरण क्रिष्णमय केले. अवंती मेश्राम हिने नृत्याने उपस्थितांची मने जिंकली, तनिष्का पवार हिने स्पेशल सादरीकरण देऊन ‘वन्स मोर’ ही दाद मिळविली.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललित घाटबांधे तर आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. स्नेहा वरकडे, कोयल मेश्राम, काजल मेश्राम व रोशन वंजारी यांनी सहकार्य केले.