शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Lok Sabha Election 2019; पावणेसहा लाख मतदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:26 IST

लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशहरी मतदारात उदासीनता : २,७८५२३ पुरूष आणि २,९५३१३ महिला मतदानाला गेल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.भंडारा-गोंदिया मतदार संघात १८ लाख आठ हजार ७३४ मतदार आहे. मतदान सक्तीचे नसले तरी सर्वांनी मतदान करावे, अशी अपेक्षा आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबविली. परंतु प्रत्यक्षात ६८.२७ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.या मतदार संघातील नऊ लाख पाच हजार २७२ पुरूष मतदारांपैकी सहा लाख २६ हजार ७४९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल दोन लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही तर नऊ लाख तीन हजार ४६० महिला मतदारांपैकी सहा लाख आठ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बत दोन लाख ९५ हजार ३१३ महिला मतदार मतदानासाठी आल्याच नाहीत.विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान बघितल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरातील एक लाख २५ हजार ९१४ आणि गोंदिया शहरातील एक लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.तुमसर विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.मतदानासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबविली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहचविण्यात आली. त्यानंतर अनेकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच नाही. शोसल मिडियावरूनही व्यापक जनजागृतीचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.मतदान टाळण्याची अनेक कारणेमतदानाला का गेले नाही, असा थेट प्रश्न विचारला असता अनेकांनी प्रचंड ऊन होते. उन्हात मतदानात जायचे कसे, असा उलट सवाल केला. कोणी निवडूण आला तरी काय फरक पडतो, असे सांगणारेही महाभाग दिसून आले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे आणि मतदार यादीत नावच सापडले नाही, असे सांगणारेही मतदार आहेत. मतदान टाळण्याचे कारणे सांगून लोकशाहीच्या उत्सवात ही मंडळी सहभागी झाली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019