लॉकडाऊनमुळे रानमेवा झाला दुर्लभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:05 IST2020-04-26T17:04:33+5:302020-04-26T17:05:48+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. त्यांचा व्यवसायही बुडाला.

लॉकडाऊनमुळे रानमेवा झाला दुर्लभ
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागली की शहरी भागातील नागरिकांना रानमेव्याचे स्मरण होते. वषार्तून एकदाच खायला मिळणारी वस्तू वाट्टेल त्या भावात घ्यायची तयारी असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे रानमेवा दुर्लभ तर झालाच पण जंगलात जाऊन रानमेवा गोळा करुन आणणारे हात रिकामे झाले. त्यांचा व्यवसायही बुडाला.
पवनी वनपरिक्षेत्रातील जंगलात खिरणी, चारं, टेंभरं, चिचबिलाई असा विविध प्रकारच्या फळांचे वृक्ष आहेत. ग्रामीण भागातील मजूर वर्ग दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात रानमेवा जंगलातून गोळा करुन शहरी भागात विक्रीसाठी घेवून येतात. पवनीतील जवाहर गेटच्या आजूबाजूला घेऊन बसतो. परंतू यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने जंगलात जाऊन रानमेवा गोळा करणे अवघड आहे आणी जंगलातून कसाबसा आणला तरी नेहमी प्रमाणे दुकान लावून बसू शकत नाही.
पवनी येथे काही महिला फिरून विक्री करीत होत्या. मात्र दिवसभर फिरूनही विक्री होत नसल्याने कवडीमोल किंमतीत रानमेवा विक्री होत आहेत.
गावात फिरुन विकण्याचा प्रयत्न केला तर संसगार्चे भितीपोटी नागरिक अनोळखी व्यक्ती कडून अशा वस्तू विकत घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे यावर्षी रानमेवा दुर्लभ झाला आणी रानमेवा गोळा करणाऱ्या मजूराचा व्यवसाय देखील बुडत असल्याने उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरानामुळे ग्रामीण महिलांवर संकट
पवनी तालुक्यात झाडे विपूल प्रमाणात असल्याने रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. वषार्तून एकदाच मिळणारा रानमेव्याला शहरात मोठी मागणी असते. मात्र गत काही दिवसांपासून कोरोना रोगाचा संसगार्चा प्रादुर्भाव वाढत चालल्याने नागरिकांनी रानमेवा खरेदीकडे पाठ फिरविली आहे. यामुळे ग्रामीण महिलांचा रोजगार बुडाला आहे.