शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

कालव्यात पडलेल्या सांभराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:28 PM

पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांभर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडली. यात त्या सांभराला वाचविण्यात वनविभागाला यश आले.

आॅनलाईन लोकमतपवनी : पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांभर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडली. यात त्या सांभराला वाचविण्यात वनविभागाला यश आले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.सांभर कालव्यात घसरुन पडल्याची माहिती वनविभागाला होताच वनविभागाचे कर्मचाºयांनी घटना स्थळी पोहचून वन्यप्रेमींच्या मदतीने कालव्यात पडलेल्या सांभराला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर काढण्यात वनविभागाला यश आले.दुपारी एक वाजताचे दरम्यान बेलघाटा वॉर्डाला लागून असलेल्या कालव्याच्या पुलाजवळ सांभर पडल्याची माहिती गावकºयांना मिळाली. परिणामी कालव्याच्या पाळीवर बघ्यांची गर्दी उसळली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी दोरखंड, जाळी व इतर साहित्य घेवून कालव्याकडे धाव घेतली. दोर व जाळीच्या सहायाने मदतीने सांभराला कालव्याच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र गावकºयांच्या गर्दी व गोंगाटामुळे दोनदा पाण्याबाहेर काढलेले सांबर पुन्हा कालव्यात कोसळले. सांभराला बहेर काढणाºया वनविभागाच्या कर्मचाºयांना व वन्यप्रेमींना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. प्रयत्नानंतर अखेर सांभराला पाण्याचे बाहेर काढून जेरबंद केले. त्याला उमरेड - पवनी- कºहांडला अभयारण्याच्या गायडोंगरी तलाव परिसरात सोडण्यात आले. सदर रेस्क्यु आॅपरेशनात वनविभागाचे वनपाल डी. टी. नंदेश्वर, कोरंभीचे वनरक्षक किशोर कोहाट, वनरक्षक मारोती केंद्रे , सारंग शिंदे वनरक्षक, पी. व्ही. शिंदे, भानुप्रतापसिंह तोमर, रामचंद्र कुर्झेकर अशोक बोरकर, महादेव शिवरकर, संघरत्न धारगावे, मयुर रेवतकर, विपीन तलमले, महेंद्र नागले, पंकज पचाल, समिर चव्हाण, आकाश दहिवले, पंकज दहिवले, पंकज तलमले, छगन डाहारे, दिनेश डाहारे, उमेश शेंडे, सतिश जांभुळकर आदींनी राबविले.