शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

दारुची बुकिंग फोनवर अन् पाण्याच्या बॉटलमधून पार्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:01 IST

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारु विक्री आणि बार रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कुठेही दारुची विक्री अधिकृतपणे होत नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनधिकृत दारु विक्रीला उधाण आले आहे. मद्यपी दारुचा शोध घेत दिवसभर दिसून येतात. सुरुवातीला काही लोकांनी केलेला स्टॉक आता संपला असून स्टॉक करणाऱ्यांवरही दारुसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअड्याळ परिसरात मोहफूल विक्री जोमात । गावाबाहेर कालव्यावर मद्यपींची दिसते गर्दी

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : लॉकडाऊनने खरी पंचाईत झाली असेल तर ती दारुड्यांची. सर्वत्र दारुबंदी असल्याने दारुसाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंतु अशा परिस्थितीवरही मात करणार नाही ते मद्यपी कुठले. अड्याळ परिसरात तर आता दारुची बुकिंग फोनवर केली जाते आणि पाण्याच्या बॉटलमधून घरपोच पार्सल मिळत आहे. तळीरामांची ही शक्कल अद्याप पोलिसांच्या दृष्टीस पडली नसली तरी दारुसाठी कालव्यावर होणारी मद्यपींच्या गर्दीकडे मात्र पोलीस दुर्लक्ष करीत आहेत.जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक देशी-विदेशी दारु विक्री आणि बार रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कुठेही दारुची विक्री अधिकृतपणे होत नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनधिकृत दारु विक्रीला उधाण आले आहे. मद्यपी दारुचा शोध घेत दिवसभर दिसून येतात. सुरुवातीला काही लोकांनी केलेला स्टॉक आता संपला असून स्टॉक करणाऱ्यांवरही दारुसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र पोलिसांचा ससेमिरा आणि थेट गुन्हे दाखल होत असल्याने मद्यपींचे पायही दारु न पिता लटलट कापतात. आता त्यावर विक्रेते आणि मद्यपींनी नामी शक्कल शोधून काढली आहे. जंगलात गाळल्या जाणाºया हातभट्टीच्या दारुची बुकींग फोनवरून केली जाते. विक्रेता मिनरल वॉटरच्या बॉटलमधून तात्काळ दारु संबंधितांपर्यंत पोहचवून देते. एक लिटरच्या हातभट्टी दारुसाठी घरपोच सेवेसाठी मोठी रक्कम घेतलीे जाते. हा प्रकार अड्याळ परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुरु आहे.अड्याळ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे यांनी शुक्रवारच्या रात्री अड्याळ परिसरातील एका शेतातील दारु अड्ड्यांवर धाड मारली. ७९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र विक्रेते तेथून पसार झाले. याप्रकरणी मुनेश्वर कुंभलकर व मनोज पचारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार सुरेश ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी