मोहदुरा येथील दारु अड्ड्यांवर धाड

By Admin | Updated: December 24, 2015 00:35 IST2015-12-24T00:35:39+5:302015-12-24T00:35:39+5:30

भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहदुरा येथे मोठ्या प्रमाणात गावठी, देशी, विदेशी दारुची विक्री राजरोसपणे खुलेआम सुरु आहेत.

On the liquor bars at Mohadura | मोहदुरा येथील दारु अड्ड्यांवर धाड

मोहदुरा येथील दारु अड्ड्यांवर धाड

दखल लोकमतची : दारु विक्रेत्याचे धाबे दणाणले
मोहदुरा : भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहदुरा येथे मोठ्या प्रमाणात गावठी, देशी, विदेशी दारुची विक्री राजरोसपणे खुलेआम सुरु आहेत.
याबाबत लोकमतमध्ये सायंकाळी भरते मद्यपींची जत्रा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. सदर बातमीची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहदुरा येथे दारु अड्यावर धाड मारली. तसेच मोठ्या प्रमाणात दारु साठा जप्त केले.
दोन ते तीन तास चाललेल्या कारवाईत दोघा दारु विक्रेत्यावर कारवाई केली. तसेच एकाला पकडून नेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गावातील महिला मंडळींनी दारु पकडण्यासाठी विशेष साथ दिली.
या सर्व प्रकरणामुळे दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. गावात संपूर्ण दारुबंदी व्हावी म्हणून आता महिला मंडळींनी कंबर कसल्याचे ठरविले आहे. काही दिवसात दारुबंदीविषयी महिला एकजुट होण्याच्या मार्गावर आहेत. याला पोलीस प्रशासनाची साथ मिळणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: On the liquor bars at Mohadura