मांडेसर येथे घरावर वीज पडून घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:02+5:302021-07-26T04:32:02+5:30

मोहाडी : मांडेसर येथे शुक्रवारी रात्री १०. ३० वाजेच्या सुमारास वीज पडून घराला आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने ...

Lightning strikes house in Mandesar | मांडेसर येथे घरावर वीज पडून घराला आग

मांडेसर येथे घरावर वीज पडून घराला आग

मोहाडी : मांडेसर येथे शुक्रवारी रात्री १०. ३० वाजेच्या सुमारास वीज पडून घराला आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराच्या स्वयंपाक खोलीतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

मांडेसर येथील रोशन चिंनीलाल बशिने व त्यांच्या परिवारातील सदस्य घराच्या समोरील हॉलमध्ये झोपले होते, सुदैवाने स्वयंपाक खोलीत त्यावेळी कोणीही नव्हते. रात्री १०.३० वाजे दरम्यान विजेचा मोठा आवाज झाल्याने सर्वांची झोप उघडली. तर स्वयंपाक खोलीत आग लागल्याचे लक्षात आले. शुक्रवार साय. ७ वाजेपासूनच विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, मांडेसर येथील रोशन बशीने यांच्या घरावर वीज कोसळल्यामुळे घराच्या स्वयंपाकघरात आग लागली. गावकऱ्यांना घराला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी घराकडे धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, यामुळे बसिने यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने ज्या ठिकाणी वीज पडली त्या ठिकाणी कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तलाठ्याने घटनास्थळावर पोहोचत नुकसानीचा पंचनामा केला आहे. बसिने कुटुंबाला शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Lightning strikes house in Mandesar