अस्वलाच्या पिलूला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:13+5:30
भटकत असलेल्या या पिलूला स्थानिक नागरिक व वनअधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवदान देण्यात आले. वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अस्वलीच्या पिल्लूला बाटलीच्या सहायाने दूध पाजले. थोड्यावेळात पिलाची आई तिथे येईल याची वाट पाहण्यात आली. संध्याकाळ होवूनही अस्वल न आल्याने वनाधिकाºयांनी पिल्लूवर नजर ठेवली.

अस्वलाच्या पिलूला जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील कवलेवाडा शिवारालगत असलेल्या पांदण रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जलवाहिणीत एका अस्वलीने मादी पिलाला जन्म दिला. भटकत असलेल्या या पिलूला स्थानिक नागरिक व वनअधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवदान देण्यात आले.
वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अस्वलीच्या पिल्लूला बाटलीच्या सहायाने दूध पाजले. थोड्यावेळात पिलाची आई तिथे येईल याची वाट पाहण्यात आली. संध्याकाळ होवूनही अस्वल न आल्याने वनाधिकाºयांनी पिल्लूवर नजर ठेवली. दुसऱ्या दिवशीही सुद्धा पिल्लूला जलवाहिणीतून बाहेर काढून दूध पाजले. काही दिवसांपुर्वी येथे एका अस्वलीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. त्यापैकी एका पिलाला सोडून निघून गेली होती. ती अस्वल येथे येवून त्या पिलाला घेवून जाणार म्हणून वनविभागाने त्या पिलाला तिथेच ठेवले होते. त्याची काळजी म्हणून पशुवैद्यकीय अधिकाºयाला पाचारण करून त्याची तपासणी करण्यात आली. सदर पिल्लू अंदाजे दोन महिन्याचे असून सुदृढ आहे. एक ते दोन दिवसात अस्वलीने पिल्लूला नेले नाही तर वन्यप्राणी संगोपन केंद्रामध्ये दाखल करण्याची सूचनाही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी वनविभागाला दिली.
घटनास्थळी वनविभागाचे पथक नजर ठेवून असून कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आला आहे. सदर पथकात भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, अनिल शेडके, निलेश श्रीरामे, नवनाथ नागरगोजे, सचिन कुकडे, महेद्र बरडे, गुरूराज नागदेवे, अनिल नरडंगे आदी कर्मचाºयांचा समावेश आहे.