डोंगरी खाणीत वाहन सोडून चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST2021-03-04T05:06:24+5:302021-03-04T05:06:24+5:30

भंडारा : मॅगनीज चोरीच्या उद्देशाने खाणीत शिरलेले चोरटे गस्त पथकाचे वाहन पाहून आपले वाहन सोडून पसार झाले. ही घटना ...

Leave the vehicle in the hill mine and pass the thief | डोंगरी खाणीत वाहन सोडून चोरटे पसार

डोंगरी खाणीत वाहन सोडून चोरटे पसार

भंडारा : मॅगनीज चोरीच्या उद्देशाने खाणीत शिरलेले चोरटे गस्त पथकाचे वाहन पाहून आपले वाहन सोडून पसार झाले. ही घटना तुमसर तालुक्यातील डोंगरी खाणीत उघडकीस आली. या प्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंगरी खाणीचे सुरक्षा निरीक्षक गोविंद पांडुरंग तलमले हे सोमवारी रात्री आपल्या पथकासह गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना खाणीत टाटा झेनाॅन वाहन आणि काही इसम प्रतिबंधित क्षेत्रातून मॅगनीज चोरत असल्याचे दिसून आले. पथक जवळ जाताच चोरटे आपल्या ताब्यातील वाहन सोडून पसार झाले. या चोरट्यांनी आपल्या वाहनात १५८ टन मॅगनीज भरले होते. मॅगनीजसह टाटा झेनाॅन गाडी जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Leave the vehicle in the hill mine and pass the thief