पवनी येथे शिव भोजन केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST2021-07-26T04:32:04+5:302021-07-26T04:32:04+5:30

पवनी : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शिव भोजन केंद्राचा शुभारंभ पवनी येथील बसस्थानकासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री ...

Launch of Shiv Bhojan Kendra at Pawani | पवनी येथे शिव भोजन केंद्राचा शुभारंभ

पवनी येथे शिव भोजन केंद्राचा शुभारंभ

पवनी : महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शिव भोजन केंद्राचा शुभारंभ पवनी येथील बसस्थानकासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नानासाहेब पंचबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार मधुकरराव कुकडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री विलासराव श्रृंगारपवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शैलेश मयूर, न. प.चे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव सुनंदा मुंडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकेश वैद्य, शहर अध्यक्ष यादवराव भोगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय सावरबांधे, चेतक डोंगरे , नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, माया चौसरे, नरेश तलमले, छोटू बाळबूधे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मधुकर कुकडे यांनी शिव भोजन केंद्र बसस्थानक, न्याय मंदिर, तहसील कार्यालयाजवळ असल्याने नागरिकांना सोयीचे आहे. केंद्राचा लाभ तालुक्यातील गरजू लाभार्थी घेतील असा आशावाद व्यक्त केला. शिव भोजन केंद्राचे संचालक कुणाल भोगे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन लोकेश वैद्य यांनी केले तर आभार शैलेश मयूर यांनी मानले.

250721\img_20210723_171616.jpg

शिव भोजन केंद्राचा शुभारंभ करताना माजी खासदार मधुकरराव कुकडे.

Web Title: Launch of Shiv Bhojan Kendra at Pawani