शेवटच्या दिवशी १२९४ नामांकन दाखल

By Admin | Updated: June 21, 2015 00:48 IST2015-06-21T00:48:09+5:302015-06-21T00:48:09+5:30

जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीमध्ये नामांकन दाखल करण्याच्या शनिवारला ...

Last night, 1294 nominations were filed | शेवटच्या दिवशी १२९४ नामांकन दाखल

शेवटच्या दिवशी १२९४ नामांकन दाखल

जि.प., पं.स. निवडणूक : अर्ज मागे घेण्यासाठी मिळणार दोन दिवस
भंडारा : जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीमध्ये नामांकन दाखल करण्याच्या शनिवारला शेवटच्या दिवशी एकूण १,२९४ नामांकन दाखल झाले आहेत. यात ५२ जिल्हा परिषद गटासाठी एकूण ५३६ तर १०४ पंचायत समिती गणासाठी एकूण ७५८ नामांकन दाखल झाले आहे.
भंडारा तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटासाठी १६० तर २० पंचायत समिती गणासाठी १९६ नामांकन, पवनी तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटासाठी ६१ तर १४ पंचायत समिती गणासाठी ११२ नामांकन, तुमसर तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटासाठी ७३ तर २० पंचायत समिती गणासाठी ११३ नामांकन, मोहाडी तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटासाठी ५८ तर १४ पंचायत समिती गणासाठी ९५ नामांकन, साकोली तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटासाठी ६२ तर १२ पंचायत समिती गणासाठी ८४ नामांकन, लाखनी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटासाठी ६२ तर १२ पंचायत समिती गणासाठी ६७ नामांकन, लाखांदूर तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटासाठी ६० तर १२ पंचायत समिती गणासाठी ९१ नामांकन दाखल झाले आहेत.
शेवटच्या दिवशी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत आपआपल्या समर्थकांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केले. त्यामुळे तालुका स्तरावरील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, संग्राम कार्यालयांना जत्रेचे स्वरूप आले होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Last night, 1294 nominations were filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.