भूस्खलनाने अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:15 IST2017-08-27T00:15:33+5:302017-08-27T00:15:44+5:30
चिखला-सीतासावंगी गावादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठे खड्डे पडले आहेत. भूस्खलनामुळे पूर्ण रस्ताच खड्यात जाण्याची शक्यता आहे.

भूस्खलनाने अपघाताची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : चिखला-सीतासावंगी गावादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठे खड्डे पडले आहेत. भूस्खलनामुळे पूर्ण रस्ताच खड्यात जाण्याची शक्यता आहे. या रस्त्यावर लहान जड वाहने धावतात. अपघाताची शक्यता असतानी संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.
चिखला-सीतासावंगी दरम्यान नवीन तलावाजवळ टेकड्यातून पाणी खाली पडतो. त्या पाण्यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूला मोठे खड्डे तयार झाले आहेत. येणाºया जाणाºयांना हे खड्डे दिसत नाही. वळणमार्गावर हे खड्डे असून रस्त्याच्या खालील माती पाण्याने वाहून गेली आहे. या मार्गावर चारचाकी, दूचाकी, ट्रक्टर, शालेय बसेससह जड ट्रकची वाहतूक आहे. येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. भूस्खलनामुळे पूर्ण रस्त्याच खड्यात जाण्याची शक्यता आहे. या रस्त्याची पाहणी करुन दुरुस्तीची मागणी चिखला येथील जि.प. सदस्य संगीता सोनवाने, सरपंच दिलीप सोनवाने, सितासावंगीच्या सरपंच रमला कठोते, उपसरपंच वामन गाढवे, दिनेश केरीया, उषा गायकवाड, किशोर बाणमारे, शरीफ खान पठान, प्यारेलाल धारगावे यांनी केली आहे. तत्काळ रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा संबंधित विभागाला दिला आहे.
चिखला व सीतासावंगी येथे जगप्रसिध्द मॅग्नीज खाणी असल्याने या रस्त्यावरुन जड ट्रकची वाहतूक सुरु असते हे विशेष.