भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संप
By Admin | Updated: August 19, 2014 23:32 IST2014-08-19T23:32:10+5:302014-08-19T23:32:10+5:30
महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सलग्नीत विदर्भ भूमिअभिलेख संघटनेच्या माध्यमातून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी १६ आॅगस्ट पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा संप
भंडारा : महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना सलग्नीत विदर्भ भूमिअभिलेख संघटनेच्या माध्यमातून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी १६ आॅगस्ट पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आज संपाचा चौथा दिवस असूनही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने भूमिच्या संदर्भातील कामकाज ठप्प पडले आहे.
भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जमिनीचे जुने बंदोबस्त अद्ययावत करणे, ‘पी वन रेकॉर्ड’ सुरक्षित ठेवणे, रेकॉर्ड दुरुस्ती करणे, जमिनीची मोजणी करणे, आखिव पत्रिका तयार करणे आदी कामे भूमी अभिलेख कार्यालयातून केल्या जाते. मात्र त्यांना कामाचा मोबदला मिळत नसल्याची ओरड असल्याने त्यांच्य ामागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.
भूमी अभिलेख खाते तांत्रिक खाते म्हणून घोषित करावे, गट क व पदसमूह ४, ३, २ या संवर्गातील सर्व पदांवरील सर्व पदांना पदनिहाय तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, खासगीकरणाची अधिसूचना रद्द करावी, कर्मचाऱ्यांच्य ा प्रतिनियुक्त्या रद्द कराव्या, नागपूर व अमरावती विभागातील पदसमुह २ मधील पदोन्नत्या तात्काळ निकाली काढाव्या. मोजणी कामाचे मासिक उद्दीष्ट्ये कमी करावे आदींसह अनेक मागण्यांची पूर्तता करावी यासाठी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यात आलेला आहे.
भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयासंबंधातील कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरीक्त अन्य कुठल्याही महसुल अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. यावरून अधिकाऱ्यांची मानवियता लक्षात येते असे या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. (शहर प्रतिनिधी)