भूमी अभिलेख कार्यालय सलाईनवर

By Admin | Updated: January 8, 2017 00:30 IST2017-01-08T00:30:11+5:302017-01-08T00:30:11+5:30

तालुक्यातील १०८ गावाचा कारभार सांभाळणाऱ्या एकमेव भूमी अभिलेख कार्यालयातील ६ पदे रिक्त असल्याने ...

Land Records office on saline | भूमी अभिलेख कार्यालय सलाईनवर

भूमी अभिलेख कार्यालय सलाईनवर

सहा पदे रिक्त : कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास
मोहाडी : तालुक्यातील १०८ गावाचा कारभार सांभाळणाऱ्या एकमेव भूमी अभिलेख कार्यालयातील ६ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सध्या २ भूकर मापक, १ आवक जावक लिपिक, १ पद दुरुस्ती लिपीक, १ पद परीरक्षण भूमापन व १ पद मुख्यालय सहाय्यक हे पदे रिक्त असून सध्या कार्यरत १ उपअधीक्षक व ३ शिपायासोबत ७ कर्मचारी १०८ गावातील मोजमाप सोबतच इतरही कामे सांभाळत आहेत. यात जनतेची कामे होत नसल्याने त्यांना जनतेच्या रोषाला जाऊन कधीकधी मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे. यातच कधीकधी पदाधिकाऱ्यांचे बोलणे सुद्धा या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागते. करडी सर्कलला एक कार्यालय ठेवण्यात आला असून यात सोमवार व गुरुवार या दोन दिवशी त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातात. पण यात कमी वेळ मिळत असल्यामुळे जनतेचा समाधान होत नाही.
उपअधीक्षक घाडगे यांना तुमसर व मोहाडी या दोन तालुक्याचा कार्यभार असल्यामुळे तेही कधी मोहाडी तर कधी तुमसर अशी कसरत करीत असतात. यामुळे जनतेला समस्या कोणाजवळ मांडाव्या हा प्रश्न पडला आहे.
तालुक्यात १२ नझुल गावे असून यात मोहाडी सर्कलमध्ये मोहाडी, डोंगरगाव, आंधळगाव, जांब, कांद्री या गावाचा समावेश असून करडी सर्कलमध्ये करडी, जांभोरा, पालोरा, मुंढरी,बेटाळा, वरठी, एकलारी या गावांचा समावेश आहे. यात बेटाळा, वरठी, एकलारी यातील जनतेला करडी सर्कलला जावे लागत असल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या नझुल गावातील दुकानाची तपासणी चालू असून सर्व दुकानाचे मोजमाप चालू असून यानंतर त्यावर शासन ग्रामपंचायत, नगरपंचायत व्यतिरिक्त वेगळा टॅक्स लावणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्वरीत रिक्त पदे भरून जनतेचा त्रास कमी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Land Records office on saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.