शेणखताचे खड्डे बनले रोगराईचे माहेरघर

By Admin | Updated: September 10, 2014 23:26 IST2014-09-10T23:26:32+5:302014-09-10T23:26:32+5:30

ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या

Land of pandemic became pits of paddy fields | शेणखताचे खड्डे बनले रोगराईचे माहेरघर

शेणखताचे खड्डे बनले रोगराईचे माहेरघर

बारव्हा : ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर हे पर्यायी व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात जागेचा अभाव दिसून येत आहे. पूर्वी शेणखताचे खड्डे गावाच्या एका बाजुला असायची व त्यासाठी राखीव शासकीय जागा राहत होती. मात्र सरकारी जागेवर बांधकामे झाल्यामुळे शेणखताचे खड्डे मुख्य रस्त्यावर त्याचप्रमाणे काही गावामध्ये घराशेजारी दिसून येतात. परिणामी या शेणखताच्या ढिगाऱ्यांमुळे गावात रोगराईचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात स्वच्दता राहावी व त्यापासून कोणताही आजार होऊ नये म्हणून जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी प्रत्येक पंचायत समितीतील गावामध्ये असणारे शेणखताचे ढिगारे त्वरीत गावाबाहेर काढावे. याबाबतचे आदेश दिले होते. त्या आदेशाची पंचायत समिती कार्यालयाने दखल घेवून ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत दखल घ्यावी याबाबत लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र कोणत्याही ग्रामपंचायतने आदेशाचे पालन न करता चक्क त्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली असल्याचे समजते. तथापि शेखणखताचे खड्डे रोगराईचे माहेरघर असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील जनतेसाठी राहणीमान सुंदर व स्वच्छ राहण्याकरिता राबविले जातात. मात्र त्यात अपयश आल्याचे चित्र लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, पारडी, मुरमाडी, मानेगाव येथे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निर्मलग्राम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, हागणदारीमुक्त गाव आदी योजना असल्या तरी गावकऱ्यांच्या असहकार्यामुळे त्या निष्फळ ठरल्या आहेत. ग्रामस्थांनी शेणखताचे ढिगारे मुख्य रस्त्यावर टाकले आहेत. त्यामुळे रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. शेणखताजवळ साचलेल्या पाण्यापासून जलजन्य आणि किटकजन्य आजार पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबद स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Land of pandemic became pits of paddy fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.